Viral Video: नृत्य, संगीत, अभिनय यांसारख्या कला क्षेत्रात आपणही खूप मोठं व्हाव, प्रसिद्ध व्हावं असं अनेकांना वाटतं. यासाठी अनेक जण आपापल्या परीने प्रयत्नही करतात. या कलाकारांसाठी हल्ली सोशल मीडियामुळे आपली कला सादर करणे खूप सोपे झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो युजर्स अशा विविध कला सादर करत असतात, ह्या कला सादर करणाऱ्यांमध्ये अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर जबरदस्त डान्समुळे सतत चर्चेत असलेल्या चिमुकलीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हल्लीची लहान मुलं खूप हुशार आणि अॅडव्हॉन्स झाली आहेत. तसेच ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे, सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील चिमुकली ‘अंबर सरिया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली बॉलीवूडमधील ‘फुकरे’ चित्रपटातील ‘अंबर सरिया’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वयाने लहान असली तरीही ही चिमुकली एखाद्या नृत्य दिग्दर्शकालाही मागे टाकेल इतका सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: “समाधानी आयुष्याची तुलना पैशाशी करू नका…” आजोबांनी नातीबरोबर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आजोबा समाधानी…”

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @barkat.arora या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास ३७ मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि तीन मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “व्वा, तिचे एक्स्प्रेशन्स कमाल आहेत.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूपच सुंदर डान्स.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “जबरदस्त.” तर आणखी अनेक युजर्स चिमुकलीचे कौतुक करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video girls dance on the song amber saria you will appreciate watching the video sap