जगात प्राण्यांची आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी करणारे अनेक लोक आहेत. माणसांप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा भावना असतात आणि ते सुद्धा भावूक होऊन रडतात सुद्धा…आपल्या जवळच्या माणसापासून आपण जेव्हा दूर जातो तेव्हाच्या वेदना या सहन करण्याच्या पलिकडे जातात. तेव्हा आपण ढसाढसा रडून मोकळे होतो. सोबतच आपल्याला काय त्रास होतोय, हे जवळच्या माणसांना सांगून आपण व्यक्त सुद्धा होतो. पण प्राण्याचं तसं नसतं. त्यांना बोलता येत नसल्याने ते माणसांप्रमाणे भडाभडा बोलून व्यक्त होत नाही. पण वेदना त्यांना होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा आपल्या मालकाच्या गळ्यात पडून अक्षरशः ढसाढसा रडू लागला. रडणाऱ्या या बकऱ्याचा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल हे नक्की.
या बकऱ्याच्या व्हिडीओने लोकांची शांतता हिरावून घेतली आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना सुद्धा त्यांचे अश्रू अनावर होत आहेत. काही सोशल मीडिया यूजर्सचे डोळेही पाणावले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक या व्हिडीओवर अनेक कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहे. या रडणाऱ्या बकऱ्याचा हा व्हिडीओ रविवारी साजरी झालेल्या बकरी ईदच्या दिवसाचा आहे. हा बकरा विकण्यासाठी आणल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मालकाने त्याचा हा बकरा विकल्यानंतर तो खांद्यावर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडू लागला.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : “लग्नानंतर दररोज साडी घालावी लागेल!” आसामच्या जोडप्याचा लग्नासाठी अनोखा करार
बकऱ्याचा रडण्याचा हा आवाज ऐकून तिथे उपस्थित असलेल्या कुणालाच त्यांचे अश्रु आवरता आले नाही. मालकाच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडणाऱ्या बकऱ्याला पाहून प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रु तरंगू लागले. मग मालकानेही आपल्या बकऱ्याला मिठी मारली. हा व्हिडीओ कुठचा आणि कधीचा आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र व्हिडीओ पाहून तो एका बकरी बाजारात शूट केल्यासारखं वाटत आहे.
आणखी वाचा : माणसांप्रमाणेच माकडांनाही स्मार्टफोनचे वेड, VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल हैराण!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : भर पावसात नाग नागिणीचा प्रणय, दीड तास सुरु होता रोमान्स
बकरीद ही मिठी ईदपेक्षा वेगळी असते. या दिवशी बकऱ्या आणि मेंढ्यांची कुर्बानी दिली जाते0. मग त्यांचे मांस तीन भागांमध्ये विभागले जाते. एक स्वतःसाठी, दुसरा नातेवाईकांसाठी आणि तिसरा गरिबांसाठी. बकरी ईदच्या दिवशी बकरे विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. ईद-उल-फित्र नंतर बकरी ईद हा मुस्लिमांचा दुसरा सर्वात मोठा सण आहे. हा सण इस्लामिक कॅलेंडरच्या १२ व्या महिन्यात साजरा केला जातो. चंद्राच्या स्थितीनुसार ही तारीख दरवर्षी बदलते. यावेळी भारतात १० जुलै रोजी बकरी ईद साजरी करण्यात आली.