Woman Viral Video: सध्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर घरात घुसून चोरी करू लागले आहेत. तसेच सोनसाखळी चोरांचीही दहशत अनेक वर्षांपासून वाढली आहे. अनेकदा हे चोरटे बाईक किंवा कारमधून येऊन सोन्याच्या मौल्यवान वस्तू किंवा पाकीट, पर्स हिसकावून नेतात.

रस्त्यानं पायी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावतात. सोशल मीडियावर अशा चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात मंदिरात बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील चेन चोरट्याने हिसकावून पळवली.

Saif Ali Khan House Help Video
हाताला पट्टी अन् कपड्यांवर रक्ताचे थेंब, सैफ अली खानबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्या मदतनीसचा Video Viral
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
thane fake baba marathi news
काळ्या जादूचा नाश करण्यासाठी बाबा आणणार होता मृतदेह, मृतदेह आणण्यासाठी बाबाने घेतले ८ लाख ८७ हजार रुपये
Viral Video of old leady enjoying zipline ride were nauvari sadi
हौसेला वयाचे बंधन नाही! कशालाही न घाबरता आजीबाईंनी लुटला झीपलाईनचा आनंद, पाहा Viral Video
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral

हेही वाचा… भररस्त्यात कपलने काय केलं पाहा! गाड्या थांबल्या तरी भान नाही, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. ही घटना बंगळुरूच्या शंकर नगर परिसरात घडली. मंदिरातच एका महिलेची सोन्याची चेन एका व्यक्तीनं पळवली. ही घटना १० ऑक्टोबर रोजी गणेश मंदिरात घडली होती आणि एकाने ती घटना व्हिडीओमध्ये कैद केली होती.

व्हिडीओमध्ये निळ्या रंगाची साडी परिधान केलेली वृद्ध महिला खिडकीजवळ बसल्याचे दिसत आहे. इतर भाविकांसह ती महिलाही प्रार्थना करताना दिसते आहे. तेवढ्यात तेथे आलेली एक व्यक्ती खिडकीतूनच हात टाकून महिलेच्या गळ्यातली चेन हिसकावते. चेनची चोरी झाल्यानंतर महिला घाबरते आणि आरडाओरडा करते. अगदी सेकंदभरात हे सगळं घडल्यानं त्या महिलेला विश्वास बसणंच कठीण होऊन जातं. आरडाओरडा केल्यानंतर तिथे असलेल्या सगळ्या महिला मदतीसाठी उठतात.

हा व्हिडीओ @DevikaRani81 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बंगळुरू – शंकर नगर येथील महालक्ष्मी लेआऊट येथील विनायक मंदिरात श्लोक पठण करताना एका महिलेच्या गळ्यातील चेन चोरट्याने खिडकीतून हिसकावून नेली, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

हेही वाचा… वो स्त्री है कुछ भी कर सकती है! दिवाळीच्या साफसफाईला केली दणक्यात सुरुवात; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “जरा तरी लाज वाटली पाहिजे होती असं करताना”, “खूपच भयानक आहे हे” अशा स्वरूपाच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

या घटनेनंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि आता चोरट्याचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाचा सक्रियतेने तपास सुरू आहे.

दरम्यान, सोनसाखळी चोरांचे असे अनेक व्हिडीओ याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बंगळुरूचं हे प्रकरण सध्या चर्चेत आहे.

Story img Loader