Viral Video Today: कुत्रा- मांजरीची भांडणं आपण कित्येकदा पाहिली असतील. पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कुत्र्याने मांजरीच्याच प्रजातीतील सगळ्यात खतरनाक प्राण्याशी पंगा घेतला आहे. गोल्डन रिट्रायव्हर जो सहसा सगळ्यात गोड गोंडस कुत्रा म्हणून ओळखला जातो त्याने द बिग कॅट म्हणजेच वाघाशी पंगा घेतला आहे. गंमत म्हणजे ही लढाई पाहण्यासाठी प्रेक्षक म्ह्णून समोर चक्क जंगलाचा राजा सिंह सुद्धा आला आहे.
एखाद्या अॅनिमेटेड कार्टूनमधील सीन शोभावा असे हे तिन्ही प्राणी जे एकमेकांसोबत दिसतील असा आपण विचारही करू शकत नाहीत त्यांची ही लढाई सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय. मुळातच हे तिघे प्राणीसंग्रहालयात एकाच ठिकाणी कसे ठेवले गेले हा ही प्रश्न आहेच पण सध्या आपण त्यांच्या या अभूतपूर्व लढाईवर लक्ष देऊयात…
इन्स्टाग्रामवर ‘animals_powers’ पेजने Dog Vs Tiger अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ४ लाख ४५ हजार व्ह्यूज आहेत आणि १७ हजाहून अधिक लाईक्स आहेत.
Video: जंगलाचा नवा राजा झेब्रा होणार का? बलाढ्य सिंह अक्षरशः रडकुंडीला आला, पाहा थरार
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक कुत्रा वाघाचे कान चावण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्या जवळ एक सिंह उभा आहे, जंगलाचा राजा खरंतर यात न्यायनिवाडा करायला जातो पण लढाई इतकी पेटलीये की तो पण चार पाऊलं मागे राहून बघत आहे. दरम्यान वाघ कुत्र्यावर पंजा मारत आहे पण कुत्र्याने वाघाचा चेहरा आणि कान घट्ट पकडले आहेत.
पाहा कुत्र्याचा वाघाशी पंगा
व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत, या प्राण्यांना एका ठिकाणी ठेवणे हीच मुळात क्रूरता आहे असे नेटकरी कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत तर काहींनी कुत्र्याच्या आत्मविश्वासाला सलाम असेही म्हंटले आहे.