पश्चिम बंगाल इथल्या नदिया जिल्ह्यातल्या एका आईची कहाणी तुम्ही ऐकाल तर अचंबित व्हाल. एक वेळचं पोट भरण्याचीही भ्रांत. नवरा नाही. मुलगा आहे, याच मुलाने एक स्वप्न पाहिलेलं. आपल्या लेकाचं स्वप्न पूर्ण करण्याचं आईनं ठरवलं. रस्त्यावर भीक मागून या आईने चिल्लर जमा केले आणि त्या पैशातून लेकासाठी स्कुटी घेतली. हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरंय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतरच तुमचा या घटनेवर विश्वास बसेल.
रस्त्यावर एखादा भिकारी पाहिला की त्यांच्याकडे आपण तुच्छ नजरेने पाहतो. पण याच भिकाऱ्यांनी एकदा जर ठरवलं तर ते काय करू शकतात, याचा प्रत्यय देणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये चिल्लर जमा करून स्वप्नातील बाइक खरेदी केल्याची बातमी तुम्ही वाचलीच असेल. अगदी अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. पश्चिम बंगालमधल्या नदिया जिल्ह्यात राहणाऱ्या बाला पाडे आणि त्यांचा मुलगा राकेश पाडे यांनी जे करून दाखवलंय ते पाहून तुम्ही बघतच बसाल. राकेश पाडे या इतर ठिकाणी मोलमजुरी करून आपल पोट भागवतो आणि आई रस्त्यावर भीक मागून दोन वेळच्या जेवणाची सोय करते.
मुलगा राकेश पाडे याने स्कुटी घेण्याचं एक स्वप्न पाहिलं होतं. लेकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने साथ दिली. रस्त्यावर बसून भीक मागून तिने एक एक रूपया जमवला. भीक मागून मिळवलेले सर्व चिल्लर आईने मुलगा राकेश याच्याकडे सोपवले. आईने दिलेले हे चिल्लर दोन तीन कॅनमध्ये भरून मुलगा राकेश याने थेट स्कुटीचं शौरूमच गाठलं. कॅनच्या कॅन भरून या मुलाने चिल्लर आणलेले पाहून शोरूममधले सारेच जण चक्रावून गेले. या चिल्लरने राकेशने त्याच्या स्वप्नातली स्कुटी खरेदी केली. त्यानंतर शोरूममधले सर्व कर्मचारी हे चिल्लर मोजण्याच्या कामाला लागले.
आणखी वाचा : बाप हा बापच असतो! लेकाच्या आनंदासाठी वडिलांनी बनवला लाकडी रणगाडा, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लज्जास्पद! भररस्त्यात एका दिव्यांगाला पती-पत्नीकडून काठीने मारहाण
शोरूम मॅनेजर सांगतात की, याआधी त्यांनी १० ते १२ हजार रुपयांपर्यंतची नाणी घेतली आहेत, पण यावेळी जे घडलं तो काहीसं वेगळं होतं. या नाण्यांना मंजुरी देताना आम्ही स्कूटी विकल्याचे त्यांनी सांगितले. कष्ट सहन करून आपल्या मुलासाठी पैसे जमा करणारी आई खरोखरच कौतुकास्पद आणि अद्वितीय आहे. आमच्याकडून जे काही करता येईल, ते आम्ही भविष्यातही करू, असं आश्वासन देखील शोरूम मॅनेजरकडून देण्यात आलंय.
दुसरीकडे राकेशने सांगितले की, “मी बाहेर मजुरी करतो आणि त्याची आई भीक मागून आपला उदरनिर्वाह करते. आईने भीक मागून जमा केलेल्या पैशातून मी ही स्कूटी खरेदी केली असून आई वृद्ध असल्यामुळे त्यांनाही स्कूटीवर बसण्यापासून आराम मिळणार आहे. मी खूप आनंदी आहे कारण आई माझ्यासाठी पैसे जमा करेल आणि मला स्कूटी घ्यायला सांगेल अशी मला अपेक्षा नव्हती.”