पूर्वीच्या काळात हिवाळा ऋतू येण्याअगोदर दोन-तीन महिने आधीपासूनच आई, ताई किंवा आजी घरातल्यांची स्वेटर विणायला घ्यायच्या. पसंतीच्या रंगाचे लोकरीचे धागे निवडून खास डिजाइनसह हे स्वेटर घरच्या घरी विणले जायचे. पण, जसा जसा काळ पुढे गेला तस आता या स्वेटरची जागा जॅकेट्स, हुडी, श्रग्स यांनी घेतली आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; ज्यात एक आजी तिच्या नातवंडांसाठी खास कंपनीच्या लोगोचं स्वेटर शिवताना दिसून आली आहे.
व्हिडीओमध्ये एका आजी प्रेमाने स्वेटर विणून ठेवले आहे. विशेष म्हणजे जगभरातील स्वेटरच्या सर्व डिजाइन बाजूला ठेवून त्यांनी असा स्वेटर विणला आहे ; जो खूपच मजेशीर आहे. आजीने पांढऱ्या रंगाच्या लोकरीच्या धाग्याचे स्वेटर विणले आहे. आजीने स्वेटर एका चिमुकल्यासाठी शिवलं आहे ; असे स्वेटरच्या आकारावून समजते आहे. एकदा तुम्हीसुद्धा बघा आजीने विणलेलं हे खास स्वेटर…
हेही वाचा…स्वेटरवरील गोळे काढण्याची अनोखी युक्ती ! महिलेने स्क्रबचा केला ‘असा’ वापर; पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, स्वेटरवर अगदी वेगळ्या शैलीत आदिदास कंपनीचे नाव (Adidas) लिहिले आहे. इतकेच नाही तर स्वेटरवर आदिदासच्या नावाबरोबर त्याचा लोगोही अतिशय पारंपरिक पद्धतीत लोकरीच्या धाग्यांच्या मदतीने शिवला आहे. हे डिजाइन अगदी हुबेहूब असून याला फक्त थोडा आजीने पारंपरिक टच देऊन आपल्या भाषेत लिहिला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @simma__sidhu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्वेटरचे कौतुक करत ‘हे देसी आदिदास आहे’ असे म्हणताना दिसत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून ‘आजीचं प्रेम जगावेगळ असतं’ असे म्हणताना दिसत आहेत. तसेच काही जण आजीच्या या अनोख्या कौशल्याचे विविध शब्दात कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.