Viral Video:भारतीय लग्नात कधी काय होईल याचा अंदाज तर मुहूर्त काढणाऱ्या गुरुजींनाही लावता येणार नाही. कधी चिडून बसलेले काका, कधी नाचता नाचता पडणारी आत्या, नवरीच्या मुरडणाऱ्या करवल्या तर त्यांना बघून उगाच स्टाईल मारणारे नवऱ्याचे मित्र. या सगळ्यात तर अनेकदा नवरा नवरी पेक्षा या वऱ्हाड्यांचीच चर्चा जास्त असते. पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील नवरदेवाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असं काही केलंय जे बघून नेटकरी म्हणतात या नवरीच्या तिथल्या तिथे त्याला सोडून द्यायला हवं होतं. नेमकं एवढं झालं काय चला तर जाणून घेऊयात..
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका लग्नातील मंगलाष्टकाचा विधी सुरु असल्याचे दिसतेय . काहीतरी हटके करायचं म्हणून या मंगलाष्टकांनंतर नवरा नवरीला ड्रोनच्या माध्यमातून पुष्पहार देण्यात येतील अशी सोय करण्यात आली आहे, मात्र तुम्ही बघू शकता जसा तो ड्रोन जवळ येतो यातील नावरदेसवं इतके चिडतात की त्याच फुलांचा हार घेऊन तो ड्रोनची धुलाई करतो.
बरं तेवढ्यावर हे नवरदेव थांबतील का तर नाहीच उलट जो माणूस हे ड्रोन कंट्रोल करत होता त्याच्याशीही नवरदेवाची भांडणं झाली. त्यालाही खडेबोल सुनावल्यावर शेवटी तो फुलांचा हार हातात घेतो एक नवरीला देतो आणि एक स्वतःकडे पकडतो. हे भांडण होताच नवरदेवाचे आई वडील, मित्र सगळे त्याला समजवण्यासाठी धाव घेतात पण नेमका त्याला कशाचा राग आला हे काही कळत नाही.
Video: नवरीपेक्षा करवली भारी, नवरोबांचा तोल ढळला आणि भर मंडपातच.. वऱ्हाडी झाले थक्क
Video: नवरीपेक्षा करवली भारी, नवरोबांचा तोल ढळला आणि भर मंडपातच.. वऱ्हाडी झाले थक्क
दरम्यान, @memewalanews ने शेअर केल्यावर या व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज आले आहेत. अनेकांनी कमेंट करून कदाचित ड्रोन हळूहळू येत असल्याने कदाचित नवरदेव चिडला असेल असे म्हंटले आहे तर काहींनी हा इतका रागीट स्वभाव पाहता त्या नवरीचे भविष्य कठीण आहे असेही म्हंटले आहे.