लग्नामध्ये रुसवे-फुगवे, धमाल मस्ती असतेच. कुणी मान सन्मान मिळाला नाही म्हणून रुसतं, तर कुणी जेवणाला नावं ठेवून मोकळे होतं. हा भाग सोडला तर लग्नात धमाल मस्ती असते. त्यात नवरीच्या बहिणी आणि मैत्रिणी वराची थट्टा मस्करी करतात, हे काही वेगळं सांगायला नको. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेव्हणी आपल्या भावजींना स्टेजवर जाऊन त्रास देत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका ठिकाणच्या लग्नाचा हा व्हिडिओ आहे. वधू आणि वर स्टेजवर बसले आहेत. बॅकग्राउंडला एक गाणेही वाजत आहे. दरम्यान, स्टेजवर वधूच्या बहिणीची एंट्री होते आणि ती जाऊन तिच्या भावजींजवळ जाऊन बसते. सुरुवातीला ती त्याच्याशी काहीतरी बोलते. यानंतर ती हळूहळू गाण्यावर नाचू लागते. तिचा डान्स पाहून तिथे उपस्थित सर्व लोक हसू लागतात.

मेव्हणीसोबतची केमिस्ट्री नेटकऱ्यांना चांगली भावत आहे. वरासोबत केलेला डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेक जण लाइक्ससोबत कमेंट्स करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video groom dance with bride sister on stage rmt
Show comments