Viral Video: समाजमाध्यमांवर डान्स, गाणी, विनोद यांसारख्या विविध विषयांवरील व्हिडीओ व्हायरल होतात, तसेच यावर लग्नाचेदेखील अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. लग्नातील या व्हिडीओंमध्ये अनेक गमतीजमती पाहायला मिळतात. ज्यात कधी विनोदी घटना घडलेल्या दिसतात, तर कधी वादविवाददेखील पाहायला मिळतात. सोशल मीडियावर अशा घटना तुफान व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

लग्न म्हटलं की, त्यात रुसवे-फुगवे, मजामस्ती पाहायला मिळतेच. हल्ली असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. मागील काही दिवसांपूर्वी एका लग्नातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एका वधूने तिच्या पतीने तिला जबरदस्ती पेढा भरवल्यामुळे त्याच्या कानाखाली मारली होती. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत असं काहीतरी झालं, ज्यावर वैतागून नवरदेवाने एका व्यक्तीला लाथ मारल्याचे दिसत आहे.

success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
The puppy will cry after the owner's scream
“आई मला ओरडू नको…” मालकिणीचा ओरडा खाऊन श्वानाच्या पिल्लाला आलं रडू , VIDEO पाहून पोटधरून हसाल
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न पार पडल्यानंतर स्टेजवर वधू आणि वर हात जोडून उभे राहतात. पण, यावेळी स्टेजखाली उभ्या असलेल्या नवरदेवाच्या मित्राने पार्टी पॉपर्स नवरदेवाच्या दिशेने उडवला, ज्यामुळे त्याचा धूर नवरदेवाच्या तोंडावर उडाला. यामुळे नवरदेव चिडतो आणि रागात सर्वांसमोर खाली उभ्या असलेल्या मित्राला जोरात लाथ मारतो. नवरदेवाचं हे कृत्य पाहून वधूदेखील चकित होते.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @anupmayadav732000ggg या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर साठ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “आधी हात जोडले आणि लगेच पायाने लाथपण मारली.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “नवरदेवाचं वागणं पाहून नवरीपण घाबरली.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “असा कसा नवरदेव आहे, त्याला मजाकपण आवडत नाही.” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “अरे हा वेडा आहे वाटतं.”

हेही वाचा: बापरे! सिंहाच्या शावकांचा पाणघोड्यावर क्रूर हल्ला… Viral VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीदेखील लग्नातील असे अनेक व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडीओमध्ये नवरदेवाचे काही मित्र गुलाबी साडी या गाण्यावर डान्स करताना दिसले होते, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये रसगुल्ला खाण्यावरून पत्नीने तिच्या पतीला मारहाण केली होती.