Viral Video: लग्नसमारंभ म्हटलं की नाच-गाणी, मजा-मस्ती, दंगा पाहायला मिळतोच. लग्नातील विविध प्रथांमध्ये खूप गमतीशीर गोष्टी पाहायला मिळतात. लग्नात हार घालण्यावरूनही अनेकदा गोंधळ उडतो; तर कधी नवऱ्या मुलाचे बूट चोरण्यावरूनही राडा झालेला पाहायला मिळतो. अनेकदा काही लग्नांमध्ये वर पक्ष आणि वधू पक्षामध्ये भांडणं झालेली पाहायला मिळतात. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही तरुण चक्क घोड्यावर बसलेल्या नवरदेवाची वरात त्याच्या घराच्या टेरेसवर काढताना दिसत आहेत.
प्रत्येक धर्मात लग्नाच्या वेळी वेगवेगळ्या रूढी-परंपरा असतात. या रूढी-परंपरांचे विशेष महत्त्व असते. हिंदू धर्मात अशीच एक परंपरा आहे. या परंपरेनुसार हिंदू धर्माच्या लग्नात नवरदेव घोडीवर बसतो. संपूर्ण गावातून नवऱ्याची घोड्यावरून वरात काढली जाते. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ आजवर तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील, ज्यात घोड्यावर बसून नवरा नाचताना तर कधी घोडा स्वतः गाण्याच्या तालावर उधळलेला पाहिलं असेल. पण, आता असा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाच्या वरातीमध्ये नवरदेवाचे अतरंगी मित्र घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला चक्क घराच्या टेरेसवर घेऊन जातात आणि तिथे उभं राहून नाचायला सुरुवात करतात. यावेळी एक जण टेरेसच्या कट्ट्यावर उभं राहून नाचतो, तर दुसरा घोड्यावर उभं राहून नाचतो; यावेळी खाली उभे राहिलेले लोकही त्यांच्याकडे आश्चर्याने पाहताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vishnu109026 या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘गाढव जेव्हा घोड्यावर बसतो तेव्हा हेच होणार’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘बिचारा घोडा’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘मूर्खांचा बाजार’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘मृत्यूला आमंत्रण देत आहेत हे.’