पावसाची सुरवात म्हणजे मुलांसाठी सगळंच नवीन. नवीन वर्ग, पुस्तक, नवीन ड्रेस. आणि गम्मत म्हणजे पाऊस खूप पडला म्हणून शाळेला मिळणारी सुट्टी. रेनकोट घालून, पाठीवर दप्तर घेऊन त्या पावसाच्या पाण्यात उड्या मारत जाणारी, साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणारी छोटी छोटी मुले पहिली की आपल्याला सुद्धा लहान व्हावेसं वाटतं. अशा काही चिमुकल्यांचा एक गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा तुमच्या बालपणीच्या पावसाळ्याच्या आठवणीतून रमून हे मात्र नक्की.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलांचा ग्रूप पावसात एकाच छत्रीत रस्त्यावरून चालत जाताना दिसून येत आहेत. चिमुकल्यांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मन जिंकून घेत आहे. जवळपास सहा मुलं एकाच छत्रीत चालताना दिसत आहेत. यातील तिघांनी शाळेचा गणवेश घातलेला दिसतोय, तर एका लहान मुलाने लेखनाची पाटी धरलेली दिसत आहे. ही सहा मुले एका छत्रीत कसंबसं बसण्याचा प्रयत्न करत आहेत. रिमझीम पावसात ही मुलं मजा मस्ती करत पावसाळ्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत. एकाच छत्रीत इतके सारे जण चालताना कुणी गडबडतं तर कुणी छत्रीबाहेर येतं. यात त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येतोय.

आणखी वाचा : Bill Gates Resume: बिल गेट्स यांनी ४८ वर्षांपूर्वीचा जुना बायोडाटा केला शेअर, नोकरी मिळवण्यासाठी पाहा काय लिहिलं?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नादच खुळा! अशी डॅशिंग सुपरबाईक तुम्ही यापूर्वी कधी पाहिली नसेल, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. यातली मुलं ज्या आनंदाने रस्त्यावरून चालत जाताना दिसून येत आहेत, ते पाहून नेटकरी आपल्या बालपणीच्या काळातल्या आठवणी शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताच तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या व्हिडीओखालील कमेंट सेक्शन पाहिलं असता प्रत्येक जण आपल्या लहानपणी पावसाळ्यात केलेली धमाल मस्ती सांगताना दिसून येत आहेत. “हा व्हिडीओ मला माझ्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून देतो,” असं एका युजरने लिहिलं आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसता…आनंद…अमूल्य….याला म्हणतात बालपण…शेअरिंग केअरिंग… कोणतीही तक्रार नाही… अहंकार नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video group of children sharing one umbrella leaves internet nostalgic childhood days rainy season memories prp