Delhi metro viral video: दिल्ली मेट्रो अनेकदा वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेचा विषय राहते. कधी भांडणाचा व्हिडीओ समोर येतो तर कधी जोडप्याच्या रोमान्सचा. मात्र, सध्या दिल्ली मेट्रोशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लोकांची चिंता वाढली आहे. वास्तविक, या व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांचा एक गट एका महिलेच्या पर्समधूल सामान चोरताना दिसत आहे. हातचलाखी करुन या महिलांचा गट विशिष्ट प्रकारे चोरी करतात. आज काल चोरीच्या अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी गाड्या चोरी करताना, कधी दागिणे, तर कधी पर्स. चोरी करण्याच्या विविध स्टाइल्स तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चोरीच्या अनेक घटना पाहून आपल्याला हसायला येते. आज एका अशा चोराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मेट्रोमध्ये चढण्याचा बहाणा करून या महिला आधी एका महिलेला चिकटण्याचा प्रयत्न करतात. यानंतर संधी मिळताच तिला धक्काबुक्की करून पर्स हिसकावतात.व्हायरल झालेला व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे. आतापर्यंत दिल्ली मेट्रो प्रत्येक बाबतीत अतिशय सुरक्षित मानली जात होती. मात्र काही लोकांमुळे आता प्रवासही लोकांसाठी असुरक्षित झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ राजीव चौक स्टेशनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिला चोरीच्या उद्देशाने मेट्रोची वाट पाहण्याचे नाटक करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, या महिला एका महिला प्रवाशाला चारही बाजूंनी घेरतात आणि नंतर त्यांचा प्लॅन पूर्ण करतात. जेव्हा ही महिला प्रवासी मेट्रोमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा या महिला तिला धक्काबुक्की करण्यास सुरुवात करतात आणि तिच्या पर्समधून वस्तू चोरतात. महिला प्रवासी मेट्रोमध्ये चढते, मात्र त्या महिला चोरी करुन मागे हटतात आणि पसार होतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Video: तोंडात सिगरेट हातात रॉकेट्स, आजोबांचा स्टंट पाहून लावाल डोक्याला हात
या घटनेचा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, या महिलांनी याआधीही अशा चोऱ्या केल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटले की, ‘दिल्ली पोलिसांनी आवश्यक कारवाई करावी. कारण ही टोळी रोज तिथे असणार. हे सहज ओळखता येतात.