Viral Video: समाजमाध्यमांवर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गुलाबी साडी या मराठमोळ्या गाण्यानेही समाजमाध्यमांवर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज मराठी, बॉलीवूड कलाकार, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावर डान्सचा नवा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून तुम्हालाही आश्चर्यचकित वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत गुलाबी साडीवर भारतीयांसोबतच परदेशातील अनेक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात किली पॉलसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. दरम्यान, आता या व्हायरल व्हिडीओमध्ये समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेला ‘डान्सिंग डॅड’ ऊर्फ ​​रिकी पाँड याने या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिकी पाँड गुलाबी साडी या गाण्यावर जबरदस्त डान्स करीत आहे. यावेळी ते गाण्यातील प्रत्येक स्टेप अगदी हुबेहूब करीत आहेत. त्याशिवाय त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावदेखील खूप सुंदर आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ricky.pond या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्युज आणि २४ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्स अनेक कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यावर एकाने लिहिलेय, “खतरनाक डान्स भाऊ.” दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप छान सर.” आणखी एकाने लिहिलेय, “एकदम जबरदस्त डान्स केला.” तर आणखी एकाने लिहिलेय, “याला म्हणतात गाणं, परदेशांनाही नाचवलं.”

दरम्यान, यापूर्वीही या लोकप्रिय गाण्यावर अनेकांनी डान्स केला आहे. समाजमाध्यमांवर सेलिब्रिटी किली पॉलनेही या गाण्यावर डान्स केला होता. तसेच बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलकारांनीदेखील या गाण्यावर डान्स केला होता. तसेच अनेक सामान्य नागरिकांनीही या गाण्यावर रील्स, व्हिडीओ बनविले आहेत.

हेही वाचा: शेवटी भूक महत्त्वाची; बिबट्याने हुशारीने रानडुकराचा केला पाठलाग अन् पुढच्या १० सेकंदात जे घडलं ते…VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

याआधी काही महिलांनी नऊवारी साडी नेसून या गाण्यावर मराठमोळ्या पद्धतीने डान्स केला होता; ज्याचा व्हिडीओदेखील खूप व्हायरल झाला होता. यावेळी त्या महिलांनी गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसून, नाकात नथ, हिरव्या बांगड्या, गळ्यात हार व केसांत गजरा माळला होता. यावेळी त्या एकदम साध्या, सोप्या व सुंदर पद्धतीने डान्स करीत होत्या. त्यांच्या साधेपणाचे समाजमाध्यमावर युजर्स खूप कौतुक करीत होते.