Viral Video: लग्न समारंभ म्हटलं की, नाच-गाणी, मजा-मस्ती, दंगा या सर्व गोष्टी आल्याच; लग्नातील विविध प्रथांमध्ये खूप गमतीशीर गोष्टी पाहायला मिळतात. लग्नात हार घालण्यावरूनही अनेकदा गोंधळ उडतो; तर कधी नवऱ्या मुलाचे बूट चोरण्यावरूनही राडा झाल्याचे पाहायला मिळते. अनेकदा काही लग्नांमध्ये वर पक्ष आणि वधू पक्षामध्ये भांडणे झालेली पाहायला मिळतात. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे काहीतरी पाहायला मिळतेय की, जे पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.
लग्नात अनेकदा वर-वधू एन्ट्रीला डान्स करताना दिसतात; तर कधी नवरदेव त्यांच्या मित्रांसोबत लग्नमंडपाबाहेर डान्स करताना दिसतो. असे दृश्य बऱ्याच लग्नांमध्ये आपण पाहत आलो आहोत. अनेकदा लग्नातील डान्समुळे आणि इतर गमतीजमतींमुळे लग्न लावणारे गुरुजी खूप चिडतात. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्न लावणारे गुरुजीच चक्क नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरलग्नमंडपात लग्न पार पडल्यानंतर लग्न लावणारे गुरुजी वधू-वराच्या समोर येतात आणि त्यांना नाचण्यासाठी आग्रह करतात. यावेळी ते स्वतःदेखील नाचायला सुरुवात करतात. गुरुजींना नाचताना पाहून वधूदेखील काही स्टेप्स करते. त्यानंतर वधू-वर एकमेकांचा हात पकडून लाजत लाजत काही स्टेप्स करतात. त्यांच्यासमोर गुरुजी मात्र खूप सुंदर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, इन्स्टाग्रामवरील @south_indian_designerhouse या अकाउंटवर तो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि ३३ हजारांहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. दरम्यान, यापूर्वीदेखील लग्नातील असे अनेक व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते; ज्यातील एका व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या मित्रांनी गुरुजींच्या डोक्यात पिशवी घातल्याचे दिसले होते. तर, आणखी एक व्हिडीओमध्ये वधू आणि वरामध्ये मिठाई खाण्यावरून वाद झाला होता.