सोशल मीडियावर रोज बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ तर वेगाने व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्या चेहऱ्यावर हसू आणत दिवसभराचा थकवा विसरण्यास मदत करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक लोकांना आवडला आहे. त्याचबरोबर अनेकांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. काही प्राणी अशा ठिकाणी अडकतात की. त्यांना तिथून बाहेर निघणं किंवा बाहेर काढणं एकदम अवघड असतं. हा व्हिडीओ देशातील प्रसिध्द उद्योजक हर्ष गोयनका यांनी ट्विटरवरती शेअर केला आहे.
नाला ओलांडत आहे कुत्र्याचं पिल्लू
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक छोटसं कुत्र्याचं पिल्लू दिसतं आहे. हे पिल्लू नाल्याच्या पलिकडे आहे, मात्र त्याला आता नाल्याच्या अलिकडे यायचे आहे. यासाठी हे पिल्लू उडी मारण्याचा प्रयतन करतंय, या पिल्लाचा प्रयत्न पाहून तुम्हालाही या पिल्लाला मदत करावीशी वाटेल. मात्र आपल्या सगळ्यांनाच माहितीये, संघर्ष हा कुणालाच चुकला नाहीय. आपआपल्या आयुष्यात काहीही मिळवण्यासाठी, एखाद्या ठिकाणी पोहचण्यासाठी स्वत:लाच संघर्ष करावा लागतो. हे पिल्लू उडी मारताना दोन वेळा मागे जाते आणि मग उडी मारतो. तरीही पडतो. मात्र हार न मानता पुन्हा वर येतो.
पाहा व्हिडीओ
देशातील प्रसिध्द उद्योजक हर्ष गोयनका यांनी आपल्या ऑफिशियल अकाउंटवरुन एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हर्ष गोयनका हे नेहमीच काही ना काही प्रेरणादायी सोशल मीडियावर शेअकर करत असतात.