निसर्ग हे स्वतःमध्येच एक न सोडवता येणारं कोडं आहे. ते आपल्याला कधी कोणत्या रूपात आश्चर्यचकित करेल हे सांगता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. हा व्हिडीओ ओडिसा राज्यातील असून व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्याला कोणी विचारले की वाघ कोणत्या रंगाचा असतो, तर आपण लगेच उत्तर देऊ की वाघ पिवळ्या रंगाचा असतो आणि त्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. मात्र, तुम्ही कधी काळ्या रंगाचा वाघ पाहिला आहे का? ओडिशा व्याघ्र प्रकल्पामध्ये एक दुर्लभ वाघ पाहायला मिळाला आहे. या वाघाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी निसर्गाच्या चमत्काराचे कौतुक करत आहेत.

Viral Video : खोल समुद्रात फडकावला तिरंगा; भारतीय तटरक्षक दलाची कामगिरी पाहून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर यासंबंधी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, “वाघ हे भारताच्या जंगलांच्या शाश्वततेचे प्रतीक आहेत… आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त दुर्मिळ मेलानिस्टिक वाघाची एक मनोरंजक क्लिप शेअर करत आहे. व्याघ्र प्रकल्पात एक अतिशय अद्वितीय जनुक पूल असलेला एका वेगळा स्त्रोत लोकसंख्येच्या पुनर्प्राप्तीसाठी तयार आहे. कौतुक!” हा दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ ओडिशा व्याघ्र प्रकल्पातील असल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल क्लिपमध्ये, एक दुर्मिळ काळा वाघ त्याच्या प्रदेशावर चिन्हांकित करताना दिसत आहे. क्षेत्र चिन्हांकित करण्यासाठी तो प्रथम झाडाभोवती फिरतो आणि त्याला धोका आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करतो. यानंतर तो आपल्या पंजाने झाडावर खुणा करतो. वाघासारख्या प्राण्यांना त्यांचा प्रदेश चिन्हांकित करणे आवश्यक आहे कारण त्यांच्यामध्ये प्रदेशासाठी युद्ध होते.

नोकराला कामावरून काढून टाकणं मालकाला पडलं महागात; Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

त्याच वेळी, आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, ‘भारताचे काळे वाघ. सिमलीपालमध्ये स्यूडो-मेलानिस्टिक वाघ आढळतात हे तुम्हाला माहीत आहे का? हे वाघ त्यांच्या अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे फार दुर्मिळ आहेत. सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात २००७ मध्ये ते पहिल्यांदा दिसले होते.’ दरम्यान, सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला ५५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video have you ever seen black tiger even the netizens were surprised to see the miracle of nature pvp