जेव्हा कोणी कमावायला सुरुवात करतो, तेंव्हा तो प्रथम त्याचे घर घेण्याचे स्वप्न पाहतो आणि विचार करतो की त्या घरात तो आपल्या कुटुंबासह राहीलं. घर किंवा फ्लॅट घेण्यासाठी माणसाला लाखो आणि करोडो रुपये जमवावे लागतात आणि कोणतेही घर तयार व्हायला महिने आणि वर्षे लागतात. लोक खूप मेहनत करून घर तयार करतात आणि त्यात वर्षानुवर्षे राहतात. कधी कधी कोणत्याही व्यक्तीच्या तीन ते चार पिढ्या तिथे राहतात. चला तुम्हाला असे घर दाखवतो, ज्याच्या तयारीला खूप कमी वेळ लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंटेनरपासून बनवलेले घर

होय, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हे दिसून येते की एक मोठा आणि उंच कंटेनर त्याच्या दुप्पट आकाराचा बनविला गेला होता आणि तो स्वतःच्या आकारानुसार दुमडला आणि उलगडला जाऊ शकतो. हे कॉम्पॅक्ट साइड हाउस पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कंटेनर बॉक्सच्या उजव्या आणि डाव्या बाजूला एक फोल्ड करण्यायोग्य खोली बनवण्यात आली आहे, जी काही सेकंदात उघडून दोन खोल्या बनवता येतात. तुम्हाला हवे तेव्हा उलगडूनही तुम्ही ते बंद करू शकता आणि हे अगदी फ्लॅटसारखं दिसत.

(हे ही वाचा: IPL Auction 2022: लिलावादरम्यान सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेली कोण आहे ‘ही’ मिस्ट्री गर्ल?)

फोल्डेबल घरांना बाजारात मागणी

कंटेनर देखील आजूबाजूला हलविला जाऊ शकतो. खोलीच्या आतील दृश्य देखील खूप सुंदर आहे. त्यात खिडक्या, दरवाजे, दिवे, सर्वकाही आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलं आहे. एवढेच नाही तर लोक ते खरेदी करण्याच्या मूडमध्ये दिसत होते.

(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)

(हे ही वाचा: Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या मुली पती आणि सासरच्या लोकांसाठी मानल्या जातात भाग्यवान!)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही कुठे हे खरेदी करू शकतो.’ त्याच वेळी, काही लोक विचारत आहेत की ते कसे बनवले आणि ते कुठून खरेदी करता येईल. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर गॅजेटग्राउंड नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video he built the house in seconds you will be amazed to see this method of construction ttg