Viral Video: अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे घरातील मोठ्या भावंडांना शिक्षण सोडून मिळेल ती नोकरी करावी लागते. ज्याप्रमाणे स्त्रियांचा जन्म सोपा नसतो; त्याचप्रमाणे घरातील वयात आलेल्या मुलाचंही आयुष्य सोपं नसतं. त्याला घरातील जबाबदाऱ्यांसह बाहेरच्या आयुष्यातील अनेक संकटांनाही तोंड द्यावं लागतं. त्याशिवाय चांगली नोकरी मिळवणं, पैसा कमावणं याकडे त्याचा कल असतो. परंतु, परिस्थितीमुळे यापैकी अनेकांना हवं ते शिक्षण घेता येत नाही आणि त्यामुळे ते उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम स्वीकारून मेहनत करीत असतात. आता अशाच एका होतकरू तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून मुलगा होणंही तितकं सोपं नाही हे कळेल.

अधिक काही नसलं तरीही दोन वेळचं जेवण आणि सुखी, समाधानी आयुष्य प्रत्येकालाच हवं असतं. आपण आपली भूक भागविण्यासाठीच दिवस-रात्र मेहनत घेतो. पण, अनेकदा काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये गुरफटलेल्या कित्येकांना पोटभर जेवण करायलाही वेळ मिळत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. ते पाहून नेटकरीही आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरउन्हामध्ये एका रस्त्याच्या कडेला डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा तरुण त्याच्या बाईकवर बसून काहीतरी खाताना दिसतोय. यावेळी त्याच्या पाठीवरचं ओझं आणि पुढील कामाला उशीर होऊ नये म्हणून सुरू असलेली गडबड त्याच्या आयुष्यातील संघर्ष दाखवून देतेय. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनं, “मुलगा होणं इतकं सोपं नाही”, असं कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dpemotional या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सात दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि आठ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: ‘शिकार करो या शिकार बनो’, बैलाची शिकार करण्यासाठी वाघाचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरनं लिहिलंय, “वारसा म्हणून अनेकदा सोनं-चांदी नाही, तर जबाबदारी मिळते.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “कोणाला दिसत नसलं तरीही मुलांचं आयुष्य खूप संघर्षमय असतं.” आणखी एकानं लिहिलंय, “माझ्या तरुणपणाचे क्षण असेच होते.” आणखी एकानं लिहिलंय, “एक दिवस हा खूप मोठा होईल.”