Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी जुलै महिन्याला सुरुवात झाली. त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊसही पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, पूर येणे अशा नैसर्गिक समस्या उद्भवतात. या पावसाच्या पाण्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे, यासंदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पावसाचा फटका अनेकदा लग्नसराईतदेखील पाहायला मिळतोय. नुकत्याच काही दिवसांपूर्वी लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्या व्हिडीओत लग्नात आलेले पाहून गुडघाभर पाण्यात जेवणाचा आस्वाद घेताना दिसले होते. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील अवाक व्हाल.

समाजमाध्यमांवर अनेकदा विविध व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. ज्यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओंमुळे आपला थरकाप उडतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा लग्नातील विविध व्हिडीओदेखील व्हायरल झालेले पाहायला मिळतात; ज्यात लग्नातील किस्से, प्रथा, भांडणं सर्व काही असते. मागील काही दिवसांपूर्वी विविध लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नातील मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या मजामस्तीमुळे बऱ्याचदा नवरदेव वैतागतो. पण, आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवरदेव चक्क पावसामुळे वैतागलेला दिसत आहे.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नसमारंभातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाच्या संपूर्ण मंडपात पाऊस पडल्याचे दिसत आहे. या पाण्यामुळे वर-वधू उभे असलेला स्टेजदेखील पाण्याने भिजला आहे. पावसामुळे इतर मंडळी सर्व सामान बांधून ठेवत आहेत. पण, नवरदेव मात्र पावसाला वैतागलेला दिसत आहे. तो नाराज झालेला दिसत आहे.

हेही वाचा: जीवापेक्षा फोटो महत्त्वाचा; जंगलात जाऊन तरुणाने चित्त्याच्या बाजूला बसून काढला फोटो, पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्राम वरील @dk_official_143 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत ३३ मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत, तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट करतानादेखील दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video Comments)

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “खूप वाईट वाटलं दोन्ही कुटुंबीयांसाठी”, दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “कढईत जेवला असणार हा म्हणून लग्नात पाऊस पडला.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलंय की, “भावा तुझ्यासाठी खूप वाईट वाटलं”; तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “खूप सुंदर डेकोरेशन केलंय.”

दरम्यान, यापूर्वीदेखील लग्नातील विविध व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडीओमध्ये काही तरुण मित्राच्या लग्नात सुंदर डान्स करताना दिसले होते, तर आणखी एका व्हिडीओमध्ये एक नवरी नवऱ्याला मारताना दिसली होती.