एखादे वाहन रस्त्यावर चालवणे अतिशय जवाबदारीचे काम असते आणि त्यात तुमची एखादी चूक तुमच्या किंवा इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते. अनेक वेळा आपल्या निष्काळजीपणामुळे आपण स्वतःचा जीव तर धोक्यात घालतोच; पण त्यामुळे अनेक अपघातही होतात. तर यासाठी मुंबई पोलीस व दिल्ली पोलिस अनेकदा नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळा असे सांगत असतात. मुंबई पोलीस, दिल्ली पोलीस वाहतुकीचे नियम सांगत सोशल मीडियाचा वापर करत असतात.तर आज दिल्ली पोलिसांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तीन मुली एका दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करताना दिसत आहेत. तसेच यातील एक तरुणी व्हिडीओ शूट करते आहे. या तिघी मिळून एका ‘जरूरी आहे’ म्हणजेच ‘गरजेचं आहे’ या मजेशीर कंटेंटवर व्हिडीओ बनवत आहेत. दुचाकी चालवणारी पहिली तरुणी म्हणते, ‘आयुष्यात मस्ती करणं गरजेचं आहे’. दुसरी म्हणते ‘फिरणे देखील महत्वाचे आहे’. तर तिसरी म्हणते की, ‘अभ्यास करणे सुद्धा महत्वाचे आहे’. तर हे ऐकताच पुढे असणाऱ्या दोन्ही तरुणी तिसऱ्या तरुणीला दुचाकीवरून उतरवतात आणि म्हणतात ‘तू फक्त अभ्यास करत राहा’. तर हा व्हिडीओ पाहून दिल्ली पोलिसांनी कोणता संदेश दिला आहे एकदा तुम्हीसुद्धा पाहा.
हेही वाचा…काय क्रिएटिव्हटी आहे राव! व्यक्तीने खिशात मावेल अशी छापली लग्नपत्रिका; सोशल मीडियावर होतेय चर्चा
पोस्ट नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अभ्यास करणे महत्वाचे आहे हे ऐकून दुचाकीवरील दोन्ही तरुणी तिसऱ्या तरुणीला दुचाकीवरून खाली उतरवतात. तर या रील बरोबर मुंबई पोलिसांनी त्यांचे ट्रॅफिक नियम जोडत सांगितले की, “ताई हेल्मेट घालणे सुद्धा महत्वाचे आहे आणि ट्रिपल सीट दुचाकी चालवणे अजिबात महत्वाचे नाही आहे”; असा दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ एडिट करत संदेश दिला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांच्या अधिकृत @DelhiPolice या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “फक्त सुरक्षा महत्त्वाची” ; अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. दिल्ली पोलिसांनी तयार केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचे विविध शब्दात कौतुक करत आहेत. तसेच या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करतानाही दिसून आले आहेत.