Viral Video Today: शेवटी ती स्त्री आहे आणि ती कोणत्याही वयात काहीही करू शकते. आयुष्यभर जबाबदाऱ्यांचं ओझं वाहणाऱ्या जीवाला कुठेतरी आपल्या चार मैत्रिणींमध्ये मोकळं व्हायची संधी मिळते. कधी रडून, कधी तक्रारी करून तर कधी पार नाचून आपला जीव हलका करण्यासाठी या बायका कदाचित ही संधी शोधतच असतात. एकदा अशी संधी मिळाली की मग तिचं कसं सोनं करायचं ते या महिलांना सांगायलाच नको. आपण झी मराठी वरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात अशाच गंमती करणाऱ्या अनेक महिला पाहिल्या असतील. गृहिणींना सगळं काही विसरायला लावणाऱ्या या शोचं अगदी अनेक सार्वजनिक ठिकाणीही आयोजन केलं जातं, अशाच एका होम मिनिस्टर कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यू होम मिनिस्टर या इंस्टाग्राम आकुतवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. यामध्ये सूत्रसंचालकाने एका रॅम्प वॉक टास्कचे आयोजन केलेले दिसत आहे. याच कार्यक्रमात एका नऊवारी नेसलेल्या आजींनी सहभाग घेतला होता. गाणं वाजताच या आजींनी असा काही वॉक केला की रॅम्पला कळत असतं तर तो ही खुश होऊन टाळ्या वाजवू लागला असता. या आजींनी स्टेजच्या शेवटी येऊन अशी काही पोझ दिली की जी बघून प्रेक्षकांसह सोशल मीडियावरील युजर्सची खूप खुश झाले आहेत.

Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
Maharashtrian old couple emotional video
आयुष्यभर नि:स्वार्थ प्रेम करणारा जोडीदार भेटायला भाग्य लागतं! मराठमोळ्या आजी आजोबांचा VIDEO होतोय व्हायरल
Elder man took female dog in toilet cruel video viral on social media
अरे जरा तरी लाज बाळगा! मादी श्वानाला शौचालयात नेलं अन्…, वृद्धाच्या विकृत कृत्याचा VIDEO व्हायरल
Shocking video woman booked for assaulting father in law with walking stick shocking video goes viral
“कर्म फिरुन येणार” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; सासऱ्यासोबत केलं असं काही की…VIDEO पाहून बसेल धक्का
Terrifying accident woman and child bus accident viral video
VIDEO: भयंकर अपघातात महिलेसह चिमुकल्याचा ‘असा’ वाचला जीव; बसमध्ये जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

होम मिनिस्टरमध्ये आजींचा रॅम्प वॉक

Video: मी मिरवणार, सगळ्यांची… ! भररस्त्यात नाचत होती ‘ही’ बाई; चेहऱ्याचा ‘तो’ भाव बघून नेटकरी फिदा

अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे यावर हजारो हजारो व्ह्यूज व लाईक्स आहेत, कमेंटमध्येही नेटकऱ्यांनी आजींच्या आत्मविश्वासाची दाद दिली आहे. या कार्यक्रमात नक्की कोण जिंकलं याबद्दल काही माहिती नसली तरी या आजींनी लाखो मनं नक्कीच जिंकली आहेत.

Story img Loader