सध्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आलाय. या व्हायरल व्हिडीओमधली महिला ही फुल टाईम नोकरी करतेय, पण एका कारमध्येच राहते. हे ऐकून तुम्हाला सुरूवातीला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. ही महिला फुल टाईममध्ये जॉब करते मग कारमध्ये कशी काय राहते ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तसंच कारमध्ये घर करून राहणं कसं शक्य आहे, असं तुम्हाला वाटत असेल. पण त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही महिला फुल टाईम जॉब करते पण सध्या ती बेघर आहे. सोशल मीडियावर ही महिला ‘बनावटी बेघर महिला’ म्हणून चर्चेत आली आहे. या २२ महिलेचं नाव आलिया असं आहे. ही महिला होम डेपोमध्ये फुल टाईम नोकरी करते. सलग पाच दिवस आठ तासांची ड्यूटी करणाऱ्या या महिलेकडे मात्र राहण्यासाठी घर नसल्यामुळे कारमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. जिममध्ये आंघोळ करते आणि ऑफीसमध्ये गेल्यानंतर दात घासते. तिचं हे शेड्यूल तिने स्वतः एक व्हिडीओ रेकॉर्ड करत कबूल केलंय. सलग पाच दिवस आठ तासांची शिफ्ट केल्यानंतरही ती अगदी फ्रेश आणि उत्साही दिसून येत असते. ही नोकरी करून तिला जेवणाची सोय आणि कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करायची आहे.
आणखी वाचा : टांझानियातील ‘त्या तरूणाची गोविंदा स्टाईलमध्ये डायलॉगबाजी, पाहा हा VIRAL VIDEO
याचा व्हिडीओ तिने तिच्या टिकटॉक अकाउंटवर शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ अगदी वाऱ्यासारखा सोशल मीडियावर पसरू लागला. हा व्हिडीओ जसजसा व्हायरल होऊ लागला, तसतसं ती ट्रोल सुद्धा होऊ लागली. सोशल मीडियावरील लक्ष वेधण्यासाठी तिने “बेघरपणाचं खोटं नाटक” केल्याचा दावा करत अनेक ट्रोलर्सनी तिला टार्गेट केलं. त्यानंतर आलियाने फॉलो-अप व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या कारमध्ये ठेवलेल्या तिच्या सर्व सांसारिक वस्तूंचा खुलासा केलाय.”मी अक्षरशः २ तास झोपेसाठी काढते, मला इच्छा आहे की ते खोटं असावं.” अशी कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केलाय.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : चमकदार डोळे असलेला हा रहस्यमय सागरी प्राणी बोटीवर बसलेल्या मच्छिमाराचा पाठलाग करत होता आणि….
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. एका युजरने म्हटले, “मुली तुझे हे प्रयत्न चालू ठेव. तू पुन्हा तुझ्या पायावर उभा राहशील, मी वचन देतो.” तर आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिले की, “एकेकाळी ती मी सुद्धा हेच करत होतो… याशिवाय काही पर्याय नाही, पण आता तू यातून बाहेर येशील! तुझ्या भविष्यातील प्रयत्नांसाठी मी तुला मनापासून शुभेच्छा देतो.”
अनेकांनी आलियाला होमर फंडाची चौकशी करावी, असं सुचवलंय. यात आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहयोगींना मदत करण्यासाठी होम डेपोने स्थापन केलेली योजना आहे.
आलियाने नंतर एक अपडेट पोस्ट शेअर करत म्हटलंय, “मला होमर फंड सुचवले त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत. सर्वांच्या पाठिंब्याने, त्यांनी मला काही काळ हॉटेल मिळवण्यासाठी आपत्कालीन निधी दिला. आशा आहे की, मला कायमस्वरूपी घर मिळेल.”