सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ एवढे मजेदार असतात की त्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. यातील काही व्हिडीओ हे थरारक असतात. सध्या असाच एक थरारक आणि अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ढोल ताशाच्या तालावर नाचण्यात दंग झालेले मित्रमंडळी आणि नातेवाईक, सुरू असलेली फटाक्यांची आतषबाजी आणि शाही थाटात सुरू वरात सुरू होती. पण अचानक या वरातीत नवरदेवाची घोडागाडीच पेटली असल्याची धक्कादायक घटना घडलीय. दैव बलवत्तर म्हणून या पेटत्या घोडागाडीवर असलेला नवरदेव थोडक्यात बचावला असून खूप मोठी दुर्घटना होता होता वाचली. सध्या या घटनेची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलीय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, मोठ्या धुमधडाक्यात नवरदेवाची वरात सुरू आहे. नवरदेवाच्या घोडागाडीवर त्याच्यासोबत काही लहान मुलं देखील बसली होती. या घोडागाडीवरून नवरदेवाची वरात लग्नाच्या ठिकाणी जात होती. या शाही मिरवणुकीत लोक बेधुंद होऊन नाचत होते आणि फटाक्याच्या आतिषबाजीत लग्नाचा आनंद साजरा केला जात होता. नवरदेवाच्या घोडागाडीत काही फटाकेही ठेवण्यात आले होते. सगळीकडे आनंदाचा माहौल सुरू असतानाच अचानक फटाक्यांची एक ठिणगी नवरदेवाच्या घोडागाडीवर पडली. यात घोडागाडीवर फटाके असल्यामुळे या घोडागाडीने पेट घेतला. केवळ एका ठिणगीमुळे बघता बघता संपूर्ण घोडागाडी पेटली. यामुळे सर्व वऱ्हाडी मंडळींनी घाबरून इकडे तिकडे धावपळ करण्यास सुरूवात केली.

अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात घबराट पसरली. आजूबाजूच्या दुकानातून आग विझवण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि आगीवर पाण्याचा मारा करत ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू लागले. काही लोकांनी घोडागाडीवरील नवरदेव आणि त्याच्यासोबत असलेल्या लहान मुलांना वेळीत खाली उतरवलं. त्यामुळे त्यांना या घटनेत कोणतीही कोणतीही इजा झाली नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एलियनसारखा दिसणारा मासा?, कपाळावर हिरवे डोळे आणि त्वचा काचेसारखी पारदर्शक! पाहून व्हाल हैराण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या ड्रामेबाज सापापुढे बडे बडे अभिनेते सुद्धा फिके पडतील, हात लावताच करतोय मेल्याचं ‘नाटक’

संपूर्ण घोडागाडी जळून खाक झाली
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जवळजवळ संपूर्ण घोडागाडी आगीच्या कचाट्यात सापडली. लोक आजुबाजूने पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बराच वेळ प्रयत्न करूनही ही आग काही आटोक्यात येण्याचं नाव घेत नव्हती. यात बघता बघता संपूर्ण घोडागाडी जळून खाक झाली. या गाडीवर असलेल्या नवरदेवाला काही झालं नसलं तरी या घटनेत एक जण पोळल्याची माहिती समोर येत आहे. तसंच या घटनेतील घोडे सुद्धा सुखरूप आहेत.

आणखी वाचा : कर्करोगाशी लढा देणाऱ्या ७७ वर्षीय आजोबांचा आईस स्केटिंग डान्सचा VIDEO VIRAL, पाहून तुम्ही व्हाल भावूक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गुजरातमधील पंचमहाल शहरातला आहे. इथल्या जोगेश्वरी महादेव मंदिरातील रहिवासी शैलेश भाई शाह यांचा मुलगा तेजस याचं लग्न होतं. त्याच्या लग्नाची वरात निघाली असताना ही घटना घडली. ही घटना तिथल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

Story img Loader