Viral Video: कोणाच्या आयुष्यात कोणती घटना कधी घडेल ते सांगता येत नाही. वेळ वाईट सुरू असली की, रस्त्यावरून जाणारी व्यक्ती असो किंवा घरात निवांत बसलेली व्यक्ती असो, त्या व्यक्तीच्या मार्गात कोणत्या ना कोणत्या रूपांनी संकटं येतातच. आता असंच एक जीवघेणं संकट एका चिमुकल्यावर आलं आहे, जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.

सोशल मीडियावर सतत विविध विषयांवरील व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात, काही आपल्याला खूप हसवतात, तर काही व्हिडीओ आपल्या काळजाचा ठोका चुकवतात. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओतही अशीच एक घटना पाहायला मिळतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला त्याच्या आई-बाबांबरोबर हॉटेलमध्ये जेवायला गेला. जेवण झाल्यानंतर एक वेटर त्यांच्या टेबलावर हात धुण्यासाठी गरम पाणी घेऊन येतो. यावेळी टेबलाजवळ येताच वेटरचा पाय सटकतो आणि त्याच्या हातातील गरम पाणी चिमुकल्याच्या संपूर्ण अंगावर पडते. यावेळी चिमुकल्याचे पालक त्याला पटकन बाजूला घेतात. पण, पाणी गरम असल्यामुळे चिमुकल्याचे अंग भाजते. खरं तर, या प्रकरणात कोणाचीही चूक नाही. पण, म्हणतात ना वेळ खराब असली की, संकट कोणत्या ना कोणत्या मार्गानं येतंच.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kalyani.lifex या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरनं लिहिलंय, “वेटरनं जरा हळू यायला हवं होतं”. दुसऱ्यानं लिहिलंय, “चिमुकला कसा आहे आता”. आणखी एकानं लिहिलंय, “जीवावर बेतलं त्याच्या”.