Viral Video: हॉटेल, रेस्टोरंट, कॅफेमध्ये तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, ग्राहकांच्या मनोरंजनासाठी खेळ (Games), टास्क, जादूगारचे शो, गाणी, डान्स आदी कार्यक्रम ठेवले जातात. तसेच हे खेळ जिंकणाऱ्या ग्राहकांना काही भेटवस्तू, तर हॉटेल, कॅफेकडून डिस्काउंट किंवा काही पदार्थ मोफत देण्यात येतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे एका हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी मजेशीर खेळ ठेवण्यात आला आहे. पण, एका तरुणाने हा खेळ अगदी चातुर्याने जिंकला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ‘तुम्ही फ्री ड्रिंक जिंकू शकता’ असे एका बोर्डवर लिहिले आहे आणि या ओळीच्या पुढे १०.०० असा क्रमांक लिहिलेला आहे. तसेच या बोर्डावर एक टायमर लावून ठेवला आहे. म्हणजेच खेळ असा आहे की, तुम्हाला टायमरकडे न बघता बोर्डावर लिहिलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंद झाल्यावर टायमर थांबवायचा आहे. तर तरुण हा टास्क पूर्ण करण्यात यशस्वी झाला की, नाही एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, टायमरच्या बाजूला ठेवलेल्या बटणावर तरुण क्लिक करतो आणि वेळ सुरु होते. तसेच तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण, तरुण अगदी वेळेत टायमरच्या बाजूला ठेवलेले बटण दाबतो आणि हा टास्क जिंकतो. हा खूप कठीण टास्क असतो. कारण दिलेल्या वेळेत टायमर थांबवणे खूप कठीण आहे. काही जण एक-दोन सेकंद उशीरा थांबवू शकतात. पण, तरुणाने बरोबर १० सेकंदांनी हा टायमर थांबवला आणि टास्क जिंकला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @awkwardgoogle एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला “अगदी १० सेकंदांवर टायमरचे बटण दाबून तरुणाने हा खेळ जिंकला आहे” ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओतील तरुणाचे कौशल्य पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल एवढं नक्की