How tequila made :टकीला ( (How tequila made) ते एक असे पेय आहे जी मद्यपान करणाऱ्यांना फार आवडते. याला टकीला शॉट्स असे म्हणतात. बारमध्ये किंवा पबमध्ये जाणाऱ्या लोकांना माहित असेल की, टकीला शॉट पिण्यासाठी लोक किती उत्साही असतात. मद्यपान करणे न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तित निर्णय आहे पण मद्यपान करण्याबाबत माहिती असेल तर त्यात काही गैर नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टकीला संबधीत अशी माहिती देणार आहोत जी क्वचितच तुम्हाला माहीत असेल. तुम्हाला माहिती आहे का टकीला कसा तयार होतो? तो लिंबू-मीठासह का प्यायला जातो (Why tequila drink with salt lemon) ? चला तर मग जाणून घेऊ या.
इंस्टाग्रामवर @foodnetwork या पेजवर खाद्यपदार्थांसंबधीत रंजक गोष्टींचे व्हिडीओ शेअर केले जातात. नुकताच या पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला ज्यामध्ये टकीला तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे. टकीला हे एक फळ आहे. टकीला हे अगावे वनस्पतींपासून बनवले जाते. व्हिडीओमध्ये हेच दाखवले आहे. कामगार या वनस्पती सर्वात आधी एकत्र करतात आणि त्यानंतर त्याच्यावर प्रक्रियेचे काम सुरू होते. यंत्राद्वारा ते कापले जाते आणि मग त्याचे द्रव पदार्थामध्ये रुपांतरण केले जाते. अनेक मशीन्सद्वारेते डिस्टिल्ड केले जाते. जेव्हा तो पूर्ण टकीला स्वरूपात येतो तेव्हा तो त्याच्या बाटलीत ओतला जातो. कॅपिंग आणि लेबलिंग केल्यानंतर ते पॅक केले जाऊ शकते.
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला ४३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकजण म्हणाला, “दारू अशा प्रकारे बनवता येईल अशी कल्पना प्रथम कोणाला आली असेल?” एकाने सांगितले की,”ते मोठ्या अननससारखे दिसते.” एकाने सांगितले की, “त्याने टकीला बनवण्याची प्रक्रिया स्वतः पाहिली होती आणि ती खूप अनोखी होती.”
टकीला मीठ आणि लिंबू का प्यावे?
ही आहे टकीला बनवण्याची प्रक्रिया, आता आपण ते लिंबू आणि मीठ घालून का पितो ते जाणून घेऊया. स्टॅनफोर्ड प्रेस वेबसाइटनुसार, असे मानले जाते की, १९ व्या शतकात टकीला पिण्याची स्पर्धा होती. लोक हे पेय मोठ्या प्रमाणात पिऊ लागले. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे टकीला तयार होऊ लागले. त्याची खराब चव दूर करण्यासाठी त्यासोबत मीठ आणि लिंबू दिले जाऊ लागले. हा मेक्सिकन संस्कृतीचा एक प्रकार होता जो आजपर्यंत प्रचलित आहे.