Viral Video: हल्ली समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता नाही, ज्यात अनेकदा प्राण्यांच्या व्हिडीओंचादेखील समावेश असतो. या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर कधी हेच प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. शिकारीच्या व्हिडीओंमुळे आपला नेहमीच थरकाप उडतो. शिवाय हल्ली प्राण्यांचे व्हायरल व्हिडीओही आपल्या कल्पनाशक्ती पलीकडचे असतात. खरंतर सिंह म्हटलं तर मनुष्यांव्यतिरिक्त प्राण्यांचाही थरकाप उडतो. पण, अनेकदा सिंहाचीच शिकार इतर प्राणी करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एक मगर सिंहावर हल्ला करताना दिसत आहे.
सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. सिंह, वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र
प्राणी जंगलातील इतर प्राण्यांवर अनेकदा हल्ला करताना दिसतात, त्यामुळे इतर प्राणी नेहमीच त्यांना घाबरून असतात. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता, ज्यात एक पाणघोडा सिंहावर हल्ला करताना दिसला होता. त्यावेळी सिंहाला आपला जीव गमवावा लागला होता. आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एक मगर सिंहावर हल्ला करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलातील एका नदीमध्ये सिंह पोहण्याचा आनंद घेत असून यावेळी पाण्यात लपून बसलेली एक मगर सिंहावर हल्ला करण्यासाठी सावध होते. सिंह जस जसा नदीच्या मध्यभागी जातो, तस तशी मगर त्याच्या मागे जाते आणि डाव साधून त्याच्यावर हल्ला करते. मगरीची ही चाल यशस्वी होते. सिंहासारख्या चपळ आणि हुशार प्राण्यावर मगरीने केलेला हल्ला पाहून नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Latestsightings या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये, “मगरीचा सिंहावर हल्ला” असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “मगरीची शिकार करण्याची पद्धत आवडली”, दुसऱ्याने लिहिलंय की, “मगरही खूप भयानक प्राणी आहे”; तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “पुढे काय घडलं असेल?”