Viral Video: अनेकदा सोशल मीडियावर प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. अनेकदा काही प्राणीप्रेमी प्राण्यांना मदत करतानाचे व्हिडीओदेखील शेअर करीत असतात. आता असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर खूप चर्चेत आला आहे; ज्यामध्ये एक तरुण सोयायटीमधील अंधाऱ्या जागेत अडकलेल्या श्वानाला बाहेर काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक जण त्या तरुणाचे खूप कौतुक करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kundra_96 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतील तरुणाचे नाव शिखर कुंद्रा असून, या व्हिडीओच्या सुरुवातीला, शिखरला कुठून तरी श्वानाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो, त्यावेळी तो इकडे-तिकडे पाहतो; पण त्याला तो श्वान कुठेच दिसला नाही. त्यानंतर तो पुढे जाऊन पाहतो, तर त्याला एका सोसयटीच्या अंधाऱ्या जागेतून श्वानाच्या रडण्याचा आवाज येतो. त्या श्वानाला अंधाऱ्या जागेत अडकलेले पाहून शिखर त्याची मदत करण्यासाठी त्या अंधाऱ्या जागेत उतरतो. त्यावेळी तो श्वान खूप थकलेला होता. त्यामुळे शिखर त्याला हाताने उचलून बाहेर काढतो.
पाहा व्हिडीओ:
शिखरने केलेली मदत पाहून युजर्स त्याचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. त्यावर एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप छान काम.. जगाला अशाच चांगल्या व्यक्तींची गरज आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मन जिंकलंस भावा!” आणखी एकाने कमेंट करून लिहिलेय, “धन्यवाद भावा! चांगलं काम केलंस तू.”
या व्हिडीओला आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आणि एक लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत.