Hundreds Of Ducks Surround Car : सोशल मीडियावर दररोज सर्व प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही खूप मजेदार तर काही थोडेसे भावनिक व्हिडीओ आहेत, जे पाहून डोळ्यात पाणी तरळतं. यामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांच्या व्हिडीओंचाही समावेश आहे. सिंह, वाघापासून ते घोडे, हत्ती, कुत्रे, मांजर अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी-कधी असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामुळे मन प्रसन्न होतं. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बदकांचा कळप सैन्याची परेड असल्यासारखं रस्त्यावरून कूच करत आहे. असे व्हिडीओ मन मोहून टाकतात आणि हा व्हिडीओ देखील असाच आहे. व्हिडीओतल्या या वेगळेपणामुळे तो प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही तो आवडेल, मन प्रसन्न होईल.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या बदकांनी रस्त्यावरची ट्रॅफिकच थांबवली. एका कारला या शेकडो बदकांनी अक्षरशः वेढलं होतं. या कारच्या ड्रायव्हरला तिथून हलता सुद्धा येत नव्हतं. हा व्हिडीओ नक्की कुठचा याबाबत अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही. काही गाड्या पांढऱ्या कारच्या मागे थांबलेल्या दिसतात, कारण संपूर्ण रस्ता बदकांनी भरलेला आहे. पांढऱ्या कारच्या समोर असलेल्या कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर पोस्ट करण्यात आला. त्यानंतर तो सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर होऊ लागला. या व्हिडीओला ६५ हजारांपेक्षा जास्त अपव्होट्स मिळाले आहेत.
आणखी वाचा : ‘आ भैंस मुझे मार..’! म्हशीसमोर मुलगी नाचू लागली, मग पुढे काय घडतं ते पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : पाण्यामध्ये पोहणाऱ्या मगरीवर जग्वारचा हल्ला, नदीत उडी घेत मान जबड्यात धरून बाहेर काढलं
रस्त्यावर असे दृश्य तुम्ही याआधी क्वचितच पाहिले असेल. रस्त्यावरील पक्ष्यांची ही कूच पाहून लष्कराच्या जवानांनाही आश्चर्य वाटावं. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करू लागले आहेत. “”तुम्हाला आज उशीर का झाला?” ” असं विचारल्यानंतर “ते बदके होते सर” असं कारण द्यावं लागेल, असं एका Reddit युजरने कमेंटमध्ये लिहिलं. तर दुसऱ्या यूझरनं ‘पक्ष्यांची ही परेड मंत्रमुग्ध करणारी आहे’ अशी कमेंट केली आहे.