Viral video: नवरा-बायकोतील भांडणं तशी काही नवी नाहीत. बहुतेक पती-पत्नीत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतातच. अगदी क्षुल्लक कारणावरूनही जोडपी भांडत असतात. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपले की, नवरा-बायकोमध्ये वाद व्हायला सुरुवात होते. कधी बायकोचा वाढदिवस लक्षात राहीला नाही म्हणून भांडण होतं तर कधी लग्नाचा वाढदिवस लक्षात राहीला नाही म्हणून वाद होतात. बायकांच्या नवऱ्याकडून फार अपेक्षा असतात, नवऱ्यानं गिफ्ट द्यावं, सरप्राीज द्यावं असं प्रत्येक स्रीला वाटतं. तर काही स्त्रीया अशा असतात ज्यांना महागड्या वस्तू, गिफ्ट, सरप्राईज नाही दिलं तरी चालेल पण प्रेमाच्या दोन शब्दांची त्यांना नेहमीच अपेक्षा असते. असंच एक प्रकरण समोर आलंय, यामध्ये एका महिलने पतीनं आपल्यासाठी एखादं छानसं गाणं म्हणावं अशी अपेक्षा ठेवली आहे, एवढच नाही तर याच कारणावरून ती थेट पोलिसात पोहोचली आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-बायको पोलीस ठाण्यात दिसत आहे. पतीने आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तो तिच्याकडे प्रेमाने पाहतो आहे. पत्नी मात्र रुसलेली आहे. नवरा आपल्यासाठी गाणं गात नाही म्हणून बायकोने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने नवऱ्याविरोधात पोलिसांकडे ही अजब तक्रार दिली. आपल्या पतीने आपल्यासाठी कधीच गाणं गायलं नाही अशी आपली अजब व्यथा तिलेन पोलिसांकडे मांडली. तिचा नवराही तिच्यामागोमाग तिथं आला. संतप्त पत्नीला शांत करण्याचा, तिची समजूत काढण्याचा तो प्रयत्न करू लागला.  अन अचानक गाणं ऐकू ेयेतं. महिलेचा नवरा तिच्यासाठी गाणं गातो. पतीच्या तोंडून आपल्यासाठी गाणं ऐकल्यानंतर पत्नीही भावुक होते. ती पतीला मिठी मारते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. नवऱ्याने गायलेलं गाणं ऐकून तिला रडूच कोसळतं.

Heroic Railway Employee Saves Young Woman from Suicide: Viral Video
आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे धावली तरुणी, कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले, धक्कादायक VIDEO VIRAL
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Momos recipe in marathi how to make tasty and healthy soya momos recipe without using maida
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हेल्दी सोया मोमोज; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Groom dance for his wife in pune on Bhetal Java Gunyat Mala Atak Kara Punyat song
“जेव्हा नवरदेवाला मनासारखी बायको भेटते..” पुण्यात तरुण नाचता नाचता कुठे पोहचला पाहा; VIDEO होतोय व्हायरल
girl committed suicide
डोंबिवलीत मोबाईल वापरण्यास दिला नाही म्हणून तरूणीची आत्महत्या
Mother and son did theft, Nagpur theft,
नागपूर : पोटासाठी काहीही! मायलेकाने चहाटपरी लावण्यासाठी…
Proud father daughter selected in police emotional video goes viral
“वडिलांच्या डोळ्यातील अश्रू सांगतात संघर्ष किती मोठा होता” लेक पोलीस झाल्यानंतर अश्रू अनावर; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल

पाहा पोस्ट –

हेही वाचा – Video viral: दोन विषारी सापांमध्ये तुफान भांडण; एकमेकांना गुंडाळलं…नेटकरीही झाले हैराण

@arvindchotia ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले असून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.