Viral Video: जंगलातील व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे नवनवीन व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात, ज्यात कधी एखादा हिंस्र प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करताना दिसतो, तर कधी कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होऊन लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तरस प्राण्यांचा समूह एका सिंहावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण पुढे असं काहीतरी होतं, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तरस जंगलातील असा प्राणी आहे, जो बऱ्याचदा समूहामध्ये राहतो आणि शिकारही समूहानेच करतो. सिंह, बिबट्या, वाघ यांसारखे हिंस्र प्राणीदेखील तरस प्राण्याला खूप घाबरतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. तरस प्राण्यांचा समूह सिंहाला त्रास देताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये तरस प्राण्यांच्या एका कळपाने सिंहाला घेरलं असून यावेळी सिंहाच्या चारही बाजूने ते त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंह यावेळी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. इतक्यात बाजूच्या एका झाडावरून एक प्राणी खाली पडतो. त्या खाली पडलेल्या प्राण्याला पाहून तरस प्राण्यांचा कळप सिंहाला सोडून झाडाखाली पडलेल्या प्राण्यावर तुटून पडतो. सिंहाचे नशीब बलवत्तर म्हणून सिंहाचा जीव वाचतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘गुलाबी साडी’नंतर ‘काली बिंदी’ गाण्याची परदेशातही हवा; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रिकी पॉंडचा जबरदस्त डान्स, Video पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ यूट्यूबवरील @Animalslover383 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाल्या आहेत, तसेच लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “सिंहाचे नशीब चांगले म्हणून त्याचा जीव वाचला”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “हा प्राणी इतर प्राण्यांसाठी खूप त्रासदायक आहे”, तर तिसऱ्याने लिहिलेय, “खूप भयानक.”