Viral Video: समाजमाध्यमांवर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्यूज मिळवतात. सध्या असाच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका बिबट्याने त्याच्या जबड्यात शिकार पकडून खाण्याच्या तयारीत असताना अचानक असं काहीतरी होतं, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनेक जण आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. पण, समाजात असेही काही लोक आहेत, ज्यांना कोणतीही मेहनत न घेता दुसऱ्यांनी मिळवलेली गोष्ट हडप करायची असते. ही कृती फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही दिसून येते. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असंच काही पाहायला मिळत आहे.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हायरल व्हिडीओ जंगलातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक बिबट्या हरणाची शिकार करतो आणि त्याला आपल्या जबड्यात पकडून झाडावरून खाली उतरण्याचा प्रयत्न करतो. पण, यावेळी अचानक तरस प्राणी तिथे येतो आणि बिबट्याच्या जबड्यातील आयती शिकार घेऊन तिथून निघून जातो. तसेच यावेळी बिबट्या, तरस प्राण्याला घाबरताना दिसत आहे.

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Maasai Sightings या अकाउंटवर शेअर केला असून यावर आतापर्यंत जवळपास ७४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “तरस आयकर विभाग अधिकारी आहे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “बिबट्या डिलिव्हरी बॉय वाटतोय.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “बिबट्यापण कोणालातरी घाबरतो”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “बिचारा बिबट्या.”

हेही वाचा: कोब्रा विरुद्ध वाघ! जंगलात दोन प्राणी एकमेकांसमोर आले अन्… VIDEO तून पाहा कोणी घेतली माघार?

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत वाघाने तळ्यात पाणी पिणाऱ्या हरणाची शिकार केली होती, तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काही म्हशींनी सिंहाच्या शावकावर हल्ला केला होता.