Hypnotising Tornado Fish Viral Video : जगात अशी अनेक रहस्ये आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण अशी रहस्ये पटण्याच्याही पलीकडील असतात. आता तुम्हाला म्हंटलं की जगात पाण्याखाली मासे एक चक्रीवादळ तयार करत आहेत. तर साहजिकच तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. हे वाचल्यानंतर कचादित आम्ही तुम्हाला एखाद्या हॉलिवूड चित्रपटातल्या सीनबद्दल सांगतोय, असंही वाटेल. पण तसं नाही. समुद्रात पाण्याखाली माशांचा एक समूह चक्रीवादळ तयार करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य तर वाटेलच, पण व्हिडीओ पाहता पाहता लोक संमेहित देखील होताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लहान मोठे अशा वेगवेगळ्या प्रकारचे मासे एकत्र येत निळ्याझार पाण्याखाली वावटळाप्रमाणे घोंघावताना दिसत आहेत. निखळ पाण्यात भोवरा तयार करून गोल गोल फिरणाऱ्या या माशांचा व्हिडीओ जर तुम्ही आणखी निरखून पाहिला तर हा व्हिडीओ तुम्हाल संमोहित सुद्धा करतो. लहान-मोठी सर्व मासे एकत्र येऊन एकाच दिशेने वावटळासारखे गोल गोल भोवरा निर्माण करताना दिसत आहेत. नरसाळ्यासारख्या निमुळत्या आकाराचा पाण्याखाली हा माशांचा भोवरा निर्माण झाला. हा भोवरा अरुंद, दोरीप्रमाणे पिळदार दिसून येतो. हा भोवरा गोल गोल फिरत असताना या व्हिडीओकडे एकटक पाहत राहल्यास आपण हिप्नोटाईज होत असल्याचा भास होऊ लागतो.

आणखी वाचा : चिप्सच्या पाकिटांपासून पिशव्या आणि बरंच काही! पुणेकर महिलांच्या या सुंदर उपक्रमाचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ सुरूवातीला ७ जुलै रोजी इन्स्टाग्रामवर जपानस्थित तात्सुरोने पोस्ट केला होता. तात्सुरो हा स्वत: ला सागरी छायाचित्रकार म्हणून काम करतो. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला ३.६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २.४ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक्स देत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.

आणखी वाचा : झोपलेल्या मालकाला उठवण्यासाठी मांजरीनं शोधली ही अजब पद्धत; VIRAL VIDEO पाहून आवरणार नाही हसू

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चालत्या गाडीच्या खिडकीतून मुलगी पडली, ड्रायव्हरला कळलंच नाही; पुढे काय झालं? पाहा VIRAL VIDEO

जपानस्थित तात्सुरो याचं इन्स्टाग्राम अकाउंट आणखी सविस्तर पाहिल्यास त्याच्या इंस्टाग्रामवर समुद्रातील विशाल आणि उत्कृष्ट फोटोग्राफीचा जणू खजिनाच सापडतो. त्याने टिपलेले सर्व दृश्य पाहताना मन मोहून जातं. समुद्राखालील हा संदर जग पाहताना मन अगदी प्रसन्न होतं. आता व्हायरल झालेल्या “फिश टॉर्नेडो” च्या व्हिडिओमध्ये अनेक लहान मासे घड्याळाच्या दिशेने एकत्रितपणे पोहताना दिसतात, अगदी वाऱ्याच्या झोताप्रमाणे भोवरा तयार करणाऱ्या या माशांचा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत.

Story img Loader