आपल्याला जसा प्राण्यांचा त्रास होतो, तसा प्राण्यांनादेखील त्यांना छळणाऱ्या माणसांचा त्रास होत असणार हे नक्की. प्रत्येक जीवाला मनसोक्त कुठेही संचार करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, जर ते नाही मिळाले किंवा त्यात कुणी अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तर प्राणी रौद्र रूप धारण करू शकतात. याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधून येत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत, पाहा नेमकं काय घडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होणारा हा व्हिडीओ भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती हत्तीची वाट अडवत त्याच्याबरोबर फोटो व सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत. पण यावर जर हत्ती रागावला तर काय होईल असा विचार या व्यक्तींनी केला का? असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून पडतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : या मांजरीचा ‘स्पा डे’ पाहून तुम्हालाही वाटेल हेवा; Viral Video वर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओ :

सुप्रिया साहू यांनी हा व्हिडीओ शेअर करत यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त एका सेल्फीसाठी हत्तीला असा त्रास देणे हा मूर्खपणा आहे. मुन्नार येथील या हत्तीने दयाळूपणा दाखवत या व्यक्तींना माफ केले. तेथील वन निरीक्षक हत्तीला काही त्रास होऊ नये यासाठी तिथे जवळून पाहणी करत आहे’ असे कॅप्शन सुप्रिया साहू यांनी दिले आहे. या व्हिडीओवरील कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.