Tina Dabi Viral Video: देशभरात कालपासून दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. फटाक्याच्या आतिषबाजीने आकाश लख्ख उजळून निघालं आहे. काही ठिकाणी फटाके फोडताना भाजल्याने अनेकजण जखमी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. फटाके फोडताना काळजी घ्यावी याविषयी अनेकजण सूचना देत असतात मात्र तरीही अनेकांकडून या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ मस्तीखोर लहान मुलं किंवा तरुणच नव्हे तर काही वेळा मोठ्या पदावर स्थित मंडळीही घाईत बेजबाबदारपणा करतात. असाच काहीसा प्रकार IAS अधिकारी टीना डाबी यांच्याबाबत घडले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये टीना डाबी यांच्या चेहऱ्याच्या अगदी जवळून फटका गेल्याचे दिसत आहे. हा थरकाप उडवणारा क्षण अनेकांकडून ट्विटरवर शेअर करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्राप्त माहितीनुसार हा व्हिडीओ जैसलमेर मधील आहे. टीना डाबी या फटाके फोडत असताना एक फटका उलट्या बाजूने उडतो. टीना डाबी यावेळी फटाक्याच्या जवळच उभ्या असतात व त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याच्या व केसाच्या अगदी कमी अंतरावरून हा फटका वेगाने जातो. राजस्थानमधील जैसलमेरच्या शहीद पूनम सिंह स्टेडियममधील हा व्हिडीओ आहे.

टीना डाबी Viral Video

दरम्यान हा व्हिडीओ दिवाळीचा नसून दसऱ्याच्या वेळी म्हणजेच रावण दहन कार्यक्रमातील असल्याचे म्हंटले जात आहे. टीना डाबी यांना या अपघातात काहीही हानी झालेली नाही मात्र हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचे पाणी पाणी होत आहे.

टीना डाबी या जम्मू काश्मीर च्या IAS टॉपर आहेत, आपल्या कामाप्रमाणेच सुंदरता व खाजगी आयुष्यामुळेही त्या अनेकदा चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी अतहर आमिर खान यांच्यासह घटस्फोट घेऊन आता प्रदीप गावंडे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांची जोडी सोशल मीडियावर बरीच गाजली होती.