सोशल मीडिया म्हटलं की व्हिडिओची आकर्षण असतं. हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात एक व्हायरल व्हिडीओ सुद्धा तुम्हाला रातोरात स्टार बनवू शकतो. रोज व्हायरल होणारे पाहून कधी आश्चर्य, तर कधी वास्तव जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी हवेत उडालेल्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. इतका वजनदार हत्ती हवेत कसा उडाला असा प्रश्न सर्वांनाच पडला. भोवऱ्याचा वेग इतका होता की काही क्षणात हत्ती हवेच्या वेगाबरोबर घिरट्या घालताना दिसत आहे. ३० सेंकदाचा हा व्हिडिओ अनेक जण शेअर करत आहेत. तसेच त्यावर कमेंट्स करत आहेत.
व्हिडिओत दिसणार हत्ती खराखुरा नसून बर्थ पार्टी, प्रमोशन यामध्ये वापरण्यात येणार हवा भरलेला फुगा आहे. हा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. काही लोकं एका ठिकाणी उभं राहून हा व्हिडिओ शूट करत आहेत.
पहिल्यांदा व्हिडिओ पहिल्यानंतर अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. मात्र हा व्हिडिओ दोन तीन वेळा पाहिल्यानंतर खरं कारण समजतं. हत्ती जरी खरा नसला तरी व्हिडिओ पाहून नेटकरी खूश होत आहेत.