Viral Video: वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी दोन मार्गांचा वापर केला जातो. एक म्हणजे हवाई मार्ग (विमान) आणि दुसरा म्हणजे सागरी मार्ग (जहाज). विमान प्रवास थोडा खर्चीक असला तरी तो जलद व आरामदायक मानला जातो. त्यामुळे बहुतेक लोक कुठे जाण्यासाठी विमान प्रवासाची निवड करतात. पण, तुम्ही कधी जगातील सगळ्यात सुंदर विमानतळ पाहिला आहे का? नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका यूट्युबरने भारतातील एका विमानतळाला जगातील सगळ्यात सुंदर विमानतळ म्हणून संबोधले आहे.
लोकप्रिय यूट्युबर आणि कन्टेन्ट क्रिएटर कार्ल रॉक याने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत त्याने बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (KIA) ची झलक दाखवली आहे. हा विमानतळ स्किडमोर, ओविंग्ज व मेरिल एलएलपी (एसओएम)द्वारे डिझाइन करण्यात आला आहे. यूट्युबरला या विमानतळाचे सौंदर्य पाहून एका क्षणासाठी त्याला वाटले की, तो सिंगापूर किंवा दुबईत आहे. पण, खरे तर तो बंगळुरूमध्ये होता. विमानतळाची रचना, नैसर्गिक प्रकाश, विविध झाडांनी नटलेल्या या विमानतळाने यूट्युबरलाही भुरळ घातली आहे. तुम्हीसुद्धा पाहा बंगळुरूमधील हा सुंदर विमानतळ.
हेही वाचा…अरेच्चा! चक्क मॅगीची हातगाडी कधी पाहिली आहे का? VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘एक्स्पायर्ड…’
व्हिडीओ नक्की बघा…
बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Bengaluru’s Kempegowda International Airport) टर्मिनल-२ मध्ये प्रिक्स व्हसार्य संस्थेने नावीन्यपूर्ण, सर्जनशीलता, स्थानिक वारशाचे प्रतिबिंब, पर्यावरणीय कार्यक्षमता व सामाजिक परस्परसंवादाची मूल्ये या विमानतळावर जपली गेली आहेत; जी तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. दोन लाख ५५ हजार ६६१ चौरस मीटरमध्ये हा विमानतळ उभारला गेला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @iamkarlrock’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रॉकने विमानतळाचे कौतुक केले आणि त्याला जगातील सर्वांत सुंदर विमानतळ, असा उल्लेख करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून विविध शब्दांत बंगळुरूच्या या विमानतळाचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.