Viral Video: माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस तयार झाला. त्यामुळे माकड हा माणसाचा मूळ पूर्वज आहे. माकडांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात; ज्यात ते माणसांप्रमाणेच भांडण करताना दिसतात अथवा काहीतरी काम करताना दिसतात. मागे व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका माकडाने हनुमान मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतले होते. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; ज्यात एक माकड चक्क मंदिरातील जेवणाच्या पंगतीमध्ये असं काहीतरी करताना दिसतोय, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
हिंदू धर्मामध्ये माकडांना भगवान हनुमानाची वानर सेना, असे म्हटले जाते. त्याशिवाय अनेक रामकथा किंवा हनुमान कथांमध्ये माकड असते. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आतादेखील एक माकड कार्यक्रमातील जेवणाच्या पंगतीमध्ये आले असून, यावेळी ते एका व्यक्तीच्या पुढ्यात बसून जेवताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कार्यक्रमामध्ये अनेक जण पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेत असताना एक माकड तिथे येते आणि त्यातील एका वृद्ध व्यक्तीच्या ताटाजवळ जाऊन बसते आणि त्याच्या ताटातील अन्नपदार्थ खायला सुरुवात करते. वृद्ध व्यक्ती आणि माकड एकाच ताटात जेवण करतात, हे पाहून अनेक जण त्या व्यक्तीकडे कौतुकाने पाहतात आणि त्या माकडाचे फोटो, व्हिडीओ काढतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, हा व्हिडीओ पाहून अनेक जण जय श्रीराम, असे म्हणताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shalu_weightlifter या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास १८ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि एक दशलक्षाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर नेटकरी अनेक कमेंट्स करीत आहेत. एकाने लिहिलेय, “ते काकापण खूप प्रेमळ आहेत.” आणखी एकाने लिहिलेय, “हनुमानस्वरूप अवतरले.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय की, हे सुख सर्वांनाच पाहायला मिळत नाही. आणखी एकाने लिहिलेय, “व्वा! किती निर्मळ आहे हे दृश्य.”