“बॉलीवूडला भारताची सॉफ्ट पॉवर उगाच म्हटले जात नाही. बॉलीवूडच्या चित्रपट आणि गाण्यांनी जगभरातील लोकांना वेड लावले आहे हे वारंवार सिद्ध होते. याचीच प्रचिती डेन्मार्कमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाली जिथे एका भारतीय तरुणीच्या अफलातून डान्स करून सर्वांना थक्क केले.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये ही तरुणीने परदेशी तरुणांबरोबर “ऊ ला ला” या बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. विद्या बालनच्या गाण्यावर तरुणीने भन्नाट डान्स केला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटत आहे. तरुणीचे हावभाव पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. तिच्या डान्सने सर्वांनाचा मंत्रमुग्ध केले.
इंस्टाग्रामवर natasha.sherpa नावाच्या खात्यावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये या तरुणीने सांगितले की, ““बॉलिवूड माझ्या रक्तात आहे. आणि आता… त्यांच्या (परदेशी लोकांच्या) हृदयात,”
शेर्पाने डेन्मार्कच्या रेड बुल डान्स युअर स्टाईल नॅशनल फायनलमध्ये डान्स केला. हा कार्यक्रम तिने होस्टही केला होता. आपल्या पोस्टमध्ये पुढे तिच्या को होस्ट, आयोजकांचे आणि तिच्या बरोबर डान्स करणाऱ्या परदेशी तरुणांचे आभार मानले. तिने श्रेया घोषालला देखील टॅग केले, जिने द डर्टी पिक्चर चित्रपटासाठी ‘ऊ ला ला’ गाणे गायले.
येथे अप्रतिम डान्स व्हिडिओ पहा:
या व्हिडीओला २५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. सध्या हा व्हिडिओ लोकांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर या गाण्याच्या गायिकेसह विविध लोकांनी कमेंट केल्या आहेत.
श्रेया घोषालची प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडीओवर हे गाणे गाणाऱ्या श्रेया घोषालने फायर इमोजी आणि दुसरा हार्ट इमोटिकॉन वापरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नेटकऱ्यांना प्रचंड आवडला व्हिडीओ
इंस्टाग्रामवर एका वापरकर्त्याने लिहिले, “आज इंटरनेटवरील सर्वोत्तम गोष्ट आहे.
“प्रत्येक डान्स स्टेपमध्ये तिची परिपूर्णता(परफेक्शन) आहे,” दुसरा म्हणाला.
तिसऱ्याने लिहिले, “मी जितक्या वेळा व्हिडिओ पाहत आहे तितक्यावेळा मला पुन्हा पाहावा वाटत आहे.
गाण्याबद्दल:
२०११ च्या द डर्टी पिक्चर चित्रपटातील ‘ऊ ला ला’ हे गाणे रजत अरोरा यांनी लिहिलेले आहे. बप्पी लहरी आणि श्रेया घोषाल यांनी गायलेले, हे नसीरुद्दीन शाह आणि विद्या बालन यांच्यावर चित्रित केले आहे.
नताशा शेर्पाचे सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रोफाइल आहेत, प्रत्येकाचे शेकडो फॉलोअर्स आहेत. ती नियमितपणे इतर डान्सरच्या सहकार्याने तिचे मनमोहक नृत्य सादर करणारे व्हिडिओ शेअर करते.
डेन्मार्कमध्ये एका बॉलीवूड गाण्यावर नाचणाऱ्या भारतीय महिलेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का?