Viral Video: आजी-आजोबांचे प्रेम, तर आई-वडिलांचा पाठिंबा मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे मुलांचासुद्धा स्वप्नांचा पाठलाग करण्याचा आत्मविश्वास आणखीन वाढतो. तर या सगळ्या गोष्टींची अनेक मुलांना जाणीव असते आणि आई-बाबा, आजी-आजोबांचे कष्ट पाहून त्यांची प्रशंसासुद्धा करतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. इंडिगो पायलटने त्याच्या कुटुंबासाठी एक खास घोषणा करून अनेक नेटकऱ्यांना भावूक केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नई ते कोईम्बतूर असा प्रवास करणाऱ्या या इंडिगो विमानामध्ये कॅप्टन प्रदीप कृष्णन पायलट असतात, तर या विमानात त्यांचे कुटुंबदेखील त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच प्रवास करणार होते. तसेच अनेकदा आजोबांबरोबर त्यांच्या गाडीवरून या पायलटने प्रवास केला होता; तर ही बाब लक्षात घेता त्यांनी टेक-ऑफपूर्वी आई आणि आजी-आजोबांसाठी एक हृदयस्पर्शी घोषणा केली आहे. काय घोषणा केली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…माणूसकी अजूनही जिवंत! तहानलेल्या श्वानाची पेट्रोल पंपाजवळ येताच ‘त्यानं’ भागवली तहान, पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

पायलट व्हिडीओत म्हणाला की, “मला ही घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे की, आज माझे कुटुंब माझ्यासोबत प्रवास करत आहे. माझे आजी, आजोबा आणि आई २९ व्या रांगेत बसले आहेत. माझे आजी-आजोबा आज माझ्यासोबत पहिल्यांदाच प्रवास करत आहेत. यापूर्वी मी त्यांच्या TVS50 गाडीच्या मागच्या सीटवर बसून कितीतरी वेळा प्रवास केला आहे. आता तुम्हाला राईड देण्याची माझी वेळ आहे”; प्रदीप कृष्णन यांनी तमिळ आणि इंग्रजी भाषेत ही घोषणा केली आहे.

घोषणा संपताच पायलटचे आजोबा त्यांच्या जागेवरून उठतात आणि इतर प्रवाशांना नम्रपणे अभिवादन करतात, तर त्याची आई टाळ्या वाजवत स्वतःचे अश्रूसुद्धा पुसताना दिसते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @capt_pradeepkrishnan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘कुटुंब आणि मित्रांना आपण चालवणाऱ्या विमानातून नेणं हे प्रत्येक पायलटचे स्वप्न असते”, अशी कॅप्शन श्री प्रदीप कृष्णन यांनी व्हिडीओला दिली आहे; जी अनेकांचे मन जिंकत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video indigo pilot special announcement for his family made everyone emotional watch ones asp