Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच विविध व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. ज्यात कधी गाड्यांच्या अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी गर्दीचे व्हिडीओ व्हायरल होतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या वादळामुळे ठाणे स्थानकावर अशीच भयानक गर्दी झाली होती. या गर्दीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, अशातच आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात बसमध्ये चढण्यासाठी अशीच भयानक गर्दी लंडनमध्ये झाल्याची दिसत आहे.

भारतातील ट्रेन, बस तसेच काही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी पाहणं आपल्यासाठी नवीन नाही. यादरम्यानचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहतो. बऱ्याचदा अशा गर्दीमध्ये भांडणं, मारहाणदेखील होते. पण अशी गर्दी अमेरिका, लंडनसारख्या देशांमध्ये शक्यतो कोणी पाहिली नसेल. असाच लंडनमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यातील गर्दी आणि बेशिस्तपणा पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहे.

jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Himachal Pradesh manali heavy snowfall shocking video
मनालीच्या अटल टनलमध्ये जीवघेणी परिस्थिती; बर्फावरुन कार घसरल्या, एकमेकांवर आदळल्या अन्…; पाहा धडकी भरवणारे VIDEO
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच

हा व्हायरल व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर) वरील @UB1UB2 West London (Southall) या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, यामध्ये तुम्ही पाहू शकता की लंडनमधील एका बसस्टॉपवर बसमध्ये चढण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. यावेळी लाइन न लावता सर्व जण बसमध्ये चढत आहेत, यामध्ये काही वृद्ध महिलादेखील बसमध्ये चढताना दिसत आहेत. नागरिकांचा हा बेशिस्तपणा पाहून सोशल मीडियावरही युजर्स ट्रोल करताना दिसत आहेत.

हेही व्हिडीओ: ओढतोय सिगारेट काढतोय धूर; चिंपांझीची ही स्टाईल पाहून युजर्स अवाक्; VIDEO वर म्हणाले, “हा पण बिघडला”

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओवर युजर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. ज्यात एकाने लिहिलंय की, “हे लंडन आहे का? मला वाटलं हे बंगळुरू आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “हा बस स्टॉप माझ्या घरापासून काही अंतरावरच आहे, इथे नेहमी असाच बेशिस्तपणा असतो.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “इथे कोणालाही एकमेकांबद्दल अजिबात आदर नाही आणि शिस्तपण नाही”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “या लोकांना रांगेत उभं राहायला काय जातं? या लोकांमध्ये समजूतदारपणा कधी येणार?”

या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून एक हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय अनेक जण यावर कमेंट्स करून संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

Story img Loader