Viral Video: समाजमाध्यमांवर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नाही तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गुलाबी साडी’ या मराठमोळ्या गाण्यानेही समाजमाध्यमांवर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालतआहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज मराठी, बॉलीवूड कलाकार, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता ‘काली बिंदी’ हे मराठी गाणं खूप चर्चेत आलं आहे.

आतापर्यंत ‘काली बिंदी’ गाण्यावर अनेक भारतीयांबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांनाही सुंदर डान्स करताना तुम्ही पाहिलं असेल. दरम्यान, आता या व्हायरल व्हिडीओमध्ये समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेला ‘डान्सिंग डॅड’ ऊर्फ ​​रिकी पाँड या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक
Video : konkani young guy dance so gracefully
“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
Car is going viral on social media because of the quotes written on its back funny photo goes viral
PHOTO: पठ्ठ्याचा प्रामाणिकपणा! कारच्या मागे लिहलं असं काही की…वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिकी पाँड ‘काली बिंदी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करीत आहे. यावेळी ते गाण्यातील प्रत्येक स्टेप अगदी हुबेहूब करीत आहेत. त्याशिवाय त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावदेखील खूप सुंदर आहेत.

हेही वाचा: बापरे! श्वानाने चक्क पेटवलेलं रॉकेट तोंडात पकडलं… पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकरी संतापले

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ricky.pond या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि ३० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्स अनेक कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यावर एकाने लिहिलेय, “सुंदर डान्स सर”, दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप छान सर.” आणखी एकाने लिहिलेय, “एकदम जबरदस्त डान्स केला.” तर आणखी एकाने लिहिलेय, “व्वा, एकदम जबरदस्त डान्स होता.”

Story img Loader