सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. वन्यजीवांबद्दल नेटकऱ्यांना कायमच कुतुहूल असतं. वन्य प्राणी कसे जगतात, काय करतात याबाबत उत्सुकता असते. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक जग्वार नदीच्या आत अजगराची शिकार करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहताना अक्षरश: अंगावर काटा येतो.

अनेकवेळा जग्वार पाण्यात असलेल्या मगरीची शिकार करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये, एक जग्वार दिसत आहे, जो पाण्याखालील अजगराची शिकार करण्यासाठी येतो आणि पटकन त्याच्यावर झेपावतो. त्याची शेपटी पकडून पाण्याबाहेर आणतो आणि त्याची शिकार करतो.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी ही लढाई वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच या व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजर्सनी प्रतिक्रिया देत लिहिलं आहे की, ‘हे निसर्गाचं चक्र आहे.’

Story img Loader