Japanese Food Vlogger Shares Vada Pav With Old Man : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडीओ लोकांना काहीतरी शिकवतात, तर काही त्यांना भावूक करतात. काही व्हिडीओ पाहून लोकांचं मन भारावून जातं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये एका जपानी युट्यूबरने मुंबईच्या रस्त्यावर बसलेल्या एका गरीब आजोबांसाठी वडा पाव विकत घेतला. एव्हढंच नव्हे तर अस्सल मुंबईकर स्टाईलमध्ये त्याने वडा पावची चवही चाखून पाहिली. मुंबईच्या वडा पावची क्रेझ थेट विदेशी नागरिकापर्यंत पोहोचलेली पाहून आपसूकच हा व्हिडीओ पाहून अभिमानही वाटू लागतो.
जपानी युट्यूबर कोकी शिशिदो याने नुकतीच मुंबईला भेट दिली. यावेळी मुंबईच्या रस्त्यावर फिरत असताना स्वतःसाठी वडापाव विकत घेतला. पण रस्त्याच्या पलीकडे एक म्हातारे आजोबा बसलेले त्याला दिसले. मग कोकी याने रस्त्यावर बसलेल्या गरीब आजोबांसाठी सुद्धा आणखी एक वडा पाव विकत घेतला आणि त्यांच्याकडे जाऊन हा वडा पाव त्यांच्या हातात दिला. यावेळी आजोबांच्या चेहऱ्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. वडा पाव दिल्याबद्दल या आजोबांनी जपानी युट्यूबरचे आभार देखील मानले. हा गोड क्षण या युट्यूबरने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला.
आणखी वाचा : पुराच्या पाण्यात कारमध्ये अडकलेल्या महिलेचा पोलिसांनी असा वाचवला जीव, पाहा हा थरारक VIRAL VIDEO
या व्हिडीओमध्ये तो मुंबईच्या वडा पावची चव देखील चाखताना दिसत आहे. अस्सल मुंबईकर स्टाईलमध्ये तो वडा पावचा आस्वाद घेताना दिसतोय. वडा पाव खात असताना तो ‘महाराष्ट्रीयन नाश्ता’ असल्याचं देखील सांगतोय. मुंबईचा वडा पाव थेट जपानी नागरिकांपर्यंत पोहोचलंय हे पाहून मुंबईकर असल्याचा आणखी अभिमान वाटू लागतो.
आणखी वाचा : TMC च्या Mahua Moitra आणि त्यांची ‘Luis Vitton Bag’ ट्विटरवर करतेय ट्रेंड, वाचा मजेदार ट्विट
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : माकडाला जादू दाखवायला निघाला, मग पुढे जे घडतं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पाहा हा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ५८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. त्याने दाखवलेल्या कृतज्ञतेचं लोक भरभरून कौतूक करताना दिसत आहेत. दुसऱ्या युजरने लिहिले की, मी सहसा कोणतीही सकारात्मक टिप्पणी करत नाही, परंतु तुमच्यासारखे निवडक लोक फक्त माणुसकीच्या नात्याने इतरांसाठी खूप काही करत आहेत हे पाहून खूप चांगलं वाटतं. असंच काम सुरू ठेवा.”