Viral Video Today: जेसीबीचं काम पाहणं नेटकऱ्यांना नेहमीच आवडतं पण याच जेसीबीमुळे आज एकाचे प्राण वाचले आहेत. एरवी बड्या अनधिकृत इमारतींचा काळ ठरणारा जेसीबी या एका इसमाचा जीवनदाता ठरला आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकाऱ्यांनी जेसीबी चालकाच्या माणूसकीचं व समयसुचकतेचं कौतुक केलं आहे.
मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात खितोली रस्त्यावरील बार्ही पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात दोन बाईकची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता, यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला होता. स्थानिकांनी अपघाताच्या नंतर तात्काळ हॉस्पिटलला संपर्क केला मात्र रुग्णवाहिका येण्यासाठी फार वेळ लागत होता. अपघात अत्यंत गंभीर असल्याने जखमी तरुणाची अस्वथा आणखीनच बिघडत गेली. शेवटी स्थानिकांनी आजूबाजूच्या रिक्षा थांबवून अपघातग्रस्त तरुणाला हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी कोणीही थांबले नाही.
साहेब अच्छे दिन…सिलेंडर डिलिव्हरीला आलेल्या तरुणाची भाषा ऐकून व्हाल थक्क, Linkedin पोस्ट होतेय Viral
या परिस्थितीत अखेरीस एका जेसीबी चालकाने मदतीचा हात पुढे केला. जवळच्याच एका दुकानदाराने अपघातग्रस्ताला उचलून घेतले व जेसीबीच्या पुढच्या भागात ठेवले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेश बर्मन हा २५ वर्षीय अपघातग्रस्त तरुण गैरतलाई येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे अपघात झाल्यावर महेश बराच वेळ वेदनेने कळवळत होता पण त्याच्या मदतीसाठी एकही रिक्षाचालक थांबला नाही.
व्हायरल व्हिडीओ
ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याजवळच पुष्पेंद्र विश्वकर्मा यांचे ऑटोमोबाईलचे दुकान आहे. त्यांच्याकडे जेसीबी आहे. रफिक नामक एका मित्राच्या मदतीने जखमीला जेसीबीच्या लोडिंग भागात झोपवले आणि बार्ही आरोग्य केंद्रात नेले. या अपघातात महेशच्या पायाला फ्रॅक्चर झाले. येथून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.