Viral Video: समाजमाध्यमांमुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात; ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. तर, काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण अवाक व्हाल.
जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा काही लोक आपल्या एकटेपणाचा फायदा घेऊन आपल्याला त्रास देतात. पण, जेव्हा आपल्यासोबत खूप जण उभे असतात तेव्हा शत्रू कितीही मोठा असला तरीही तो पळून जातो. अशीच घटना या व्हिडीओमध्येही पाहायला मिळत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून, त्यामध्ये एक म्हैस जंगलातील गवताळ प्रदेशातून चालत असताना अचानक तिला चारही बाजूंनी सिंहाचे शावक घेरतात. सिंहाच्या त्या शावकांना पाहून म्हैस कावरीबावरी होते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात ती सर्व पिल्लं म्हशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात; पण तरीही त्यांच्या तावडीतून सटकून म्हैस पळ काढते. मग ते सर्व जण मिळून तिचा पाठलाग करतात; पण पुढे गेल्यावर तिला म्हशींचा कळप दिसतो. ती म्हैस त्या कळपाकडे धावत जाते. पण, सिंहाचे शावक तरीही तिला भक्ष्य बनविण्यासाठी तिचा पाठलाग करतात. सिंहाच्या शावकांना पाहून कळपातील सर्व म्हशी पटापट पुढे येतात आणि त्यांना त्या गवताळ प्रदेशातून हाकलवतात.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ यूट्यूबवरील @Maasai Sightings या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आह. त्याला आतापर्यंत जवळपास तीन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने लिहिलेय, “म्हैस लकी आहे; नाही तर सिंहाच्या शावकांनी तिचा जीवच घेतला असता.” तर दुसऱ्या एकाने लिहिलेय, “खरंच जेव्हा आपले कुटुंब मोठे असते तेव्हा बाहेरचे कोणीही आपल्याला त्रास देऊ शकत नाही.” तर आणखी एकाने लिहिलेय, “त्यांना वाटले तेच बॉस; पण त्यांचा पचका झाला.” आणखी एकाने लिहिलेय, “हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हते.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “तुम्ही प्राण्यांची काळजी घ्या. त्यांना एकटे सोडा. मूर्ख पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी प्राण्यांना दाखवू नका.”