दुस-याला जेवू घालणे यापेक्षा कोणतेही चांगले काम व्यक्तीकडून कडून होऊ शकत नाही. आजच्या महागाईच्या काळात माणसाला एक वेळचे जेवण खायला १०० ते २०० सहज रुपये लागतात. तरीही, त्याला चांगले जेवण मिळू शकत नाही. पण आपल्या देशात सर्व काही शक्य आहे. कर्नाटकातील मणिपाल येथे राहणारे एक वृद्ध जोडपे त्यांच्या एका कामामुळे चर्चेत आहे. ते लोकांना अगदी कमी किमतीत जेवू घालतात. त्याचे एक छोटेसे भोजनालय आहे ज्यामध्ये तो केळीच्या पानांवर पारंपारिक पद्धतीने जेवण वाढतात. नुकताच त्याचा एक व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये आजी-आजोबा केळीच्या पानावर घरी बनवलेले जेवण सर्व्ह करताना दिसत आहेत. त्याच्या रेस्टॉरंटमध्ये ते रसम, डाळ, लोणचे, कोशिंबीर, दही आणि इतर पदार्थ असलेले अमर्यादित अन्न फक्त ५० रुपयांमध्ये खायला देतात.

(हे ही वाचा: Viral Video: हरणाच्या शेपटातील फर काढून कावळ्याने बनवले घरटे, व्हिडीओ बघून नेटकरी आश्चर्यचकित)

(हे ही वाचा: Viral Video: बॉक्सिंग चँपियन माइक टायसननं विमानातच केली प्रवाशाची धुलाई, कारण…)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

@rakshithraiy ने त्याचा व्हिडीओ इन्स्टा वर शेअर केला आहे. त्याचे कॅप्शन त्याने लिहिले, ‘हे ठिकाण माझ्यासाठी भावनात्मक अनुभव बनले आहे. अगदी वाजवी दरात घरचे जेवण. इतकेच काय, या वृद्ध जोडप्याचे स्नेह अविश्वसनीय आहे. ते नक्कीच आमच्यापेक्षा जास्त प्रेमाच्या पात्र आहेत.’ मिळालेल्या माहितीनुसार, हे वृद्ध जोडपे १९५१ पासून हॉटेल गणेश प्रसाद नावाने त्यांचे रेस्टॉरंट चालवत आहेत. तो घरातील वडीलधाऱ्यांप्रमाणे लोकांना मोठ्या प्रेमाने खाऊ घालतो, त्यामुळे त्याच्याकडे जास्त लोक येतात. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतरांनीही असे उदात्त कार्य करण्याचा सल्ला दिला.