Mother Brutally Beats Son : मातृत्वाला कलंक लावणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक आई आपल्या मुलाला बेदम मारहाण करून, चावा घेत आणि त्याचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती महिला निष्पाप मुलाच्य अंगावर बसली आहे आणि त्याचे डोके जमिनीवर आपटतं आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना हरिद्वारच्या रुरकी येथे घडली असून या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुलालाअमानुषपणे मारहाण करणारी महिला मुलाची आई आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिलेने आपल्या मुलावर केलेल्या भीषण हल्ल्याचा साक्षीदार तिथे उभा असलेला आणखी एक मुलगा आहे. अल्पवयीन मुलगा महिलेच्या समोर उभा आहे जेव्हा ती आपल्या दुसऱ्या मुलाला मारहाण करत आहे. महिलेने आधी मुलाला त्याच्या पाठीवर ठोसा मारला आणि तो मुलगा वेदनेने ओरडताना दिसतो. त्यानंतर, महिलेने मुलाला त्याच्या केसांनी पकडले आणि वारंवार त्याचे डोके जमिनीवर आपटले. त्यानंतर ती महिला व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीवर ओरडते आणि त्याला शूटिंग करत राहण्यास सांगते.

हेही वाचा – पेट्रोलचे पैसे मागितले म्हणून पोलिस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, Video Viral

ते मुल रडत आहे आणि त्याला सोडून देण्याची विनंती करत आहे; मात्र, ती महिला त्याच्या विनवणीकडे लक्ष देत नाही आणि त्याला मारहाण करत राहते. तो मुलगा त्या महिलेला आधी पाणी देण्यास सांगतो. तो विनवणी करताना दिसतो, “मम्मी पहले पानी दे दो मुझे” (मम्मी, मला आधी पाणी दे) कारण ती बाई अनेक वेळा मुलाच्या तोंडावर चापट मारते. त्यानंतर, महिलेने मुलाला त्याच्या छातीवर दोन्ही बाजूंनी चावा घेतला. त्यानंतर महिलेने आपल्या हातांनी मुलाचा गळा दाबून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला.

महिलेने त्याचा गळा दाबल्याने बालक गुदमरताना दिसत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती तो मरेल असे ओरडते त्यानंतर महिलेने मुलाला सोडले. मुल पुन्हा पाणी मागू लागते; त्यानंतर ती महिला पुन्हा मुलाला कानाखाली मारते आणि ठोसे मारण्यास सुरुवात करते.

शेवटी मुलगा कसाबसा महिलेच्या तावडीतून सुटतो आणि महिला मुलाला लाथ मारते. मुलगा तेथून पळून जातो. आईच्या या राक्षसी वर्तनावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. काही सोशल मीडिया वापरकर्ते महिलेला मानसिकदृष्ट्या अस्थिर म्हणत आहेत, तर इतर वापरकर्ते महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा – एक चूक अन् खेळ खल्लास! रिलसाठी पुराच्या पाण्यात तरुणाचा जीवघेणा स्टंट, पाईपलाईनवर बसून ओलांडतोय नदी, Video Viral

एक्सवर ‘घर के कलेश’ नावाच्या पेजरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत आहे. तिने आपल्या मुलाला निर्दयीपणे मारहाण केली, तिच्या मोठ्या मुलाला हा व्हिडिओ बनवण्यास भाग पाडले आणि हा व्हिडिओ तिच्या पतीला “धडा” शिकवण्यासाठी पाठवला. मुलगा अवघ्या ११ वर्षांचा असून तो त्याच्या पालकांमधील भांडणाचा बळी पडला आहे. कोणतेही मुलाला असे पालक भेटू नये. हा व्हिडिओ झाबरेरा, हरिद्वार, उत्तराखंड येथील आहे. महिलेला अटक करण्यात आली असून तिचे समुपदेशन करण्यात येत आहे. तिच्या पतीचीही चौकशी सुरू आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video kid kept asking for water and the cruel mother was sitting on him and brutally beating him biting him biting him and hitting his head on the ground snk