Viral Video: सोशल मीडियामुळे सतत विविध गाणी व्हायरल होताना आपण पाहतो. रिल्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाल्यापासून जगभरातील काही गाणी क्षणात लोकप्रिय होतात. गाणं व्हायरल होताच लाखो युजर्स त्यावर रिल्सदेखील बनवतात. शिवाय रिल्सवरच नाही तर अनेक कार्यक्रमांमध्येही ही गाणी आवर्जून लावली जातात. सध्या सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’ हे मराठमोळं गाणं प्रचंड लोकप्रिय होत आहे. या गाण्याला अनेक लोक पसंती देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अनेकांना अगदी या गाण्याचे वेड लागले आहे. या गाण्यावर लोक रिल्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. शिवाय अनेक प्रसिद्ध कलाकारही या गाण्यावर रिल्स करताना दिसत आहेत.
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर सामान्य लोकांनीच नाही तर मराठी कलाकार, बॉलीवूड तसेच परदेशातील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही रिल्स बनवलेले आपण पाहिले आहेत. या गाण्यावरील नवनवीन रिल्स दररोज आपल्या समोर येतात; ज्यात महिला, पुरुष मंडळी, वृद्धदेखील दिसतात. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक गोड लहान मुलगा नाचताना दिसत आहे, शिवाय त्याच्यासोबत त्याची बहीण आणि आईदेखील आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक गोड निरागस लहान मुलगा गुलाबी साडी गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावदेखील पाहण्यासारखे होते. शिवाय त्या मुलाच्या मागे त्याची बहीणदेखील सुंदर डान्स करताना दिसत आहे; तर त्याची आईदेखील यावेळी त्याच्या मागे बसून सुंदर एक्स्प्रेशन देताना दिसत आहे. या मुलाचा हा गोड व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @one.sided.lovers_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास साठ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत; तर एक हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “लहान मुलं खूप छान करतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “व्वा, किती निरागस बाळ आहे.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “खूप सुंदर, मस्तच”; तर आणखी एकाने लिहिलंय की, “एकदम कडक डान्स.”
दरम्यान, यापूर्वीदेखील गुलाबी साडी या गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवले होते, शिवाय हे तितकेच व्हायरलदेखील झाले होते; ज्यात एका महिलांच्या ग्रुपनेदेखील गुलाबी नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या पद्धतीने डान्स केला होता, तर काही पुरुषांनी मॉर्निंग वॉकला गेल्यावर रील बनवला होता.