Dog viral video: अनेक जणांना आपल्या घरात पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. घरात कुत्रा पाळणे तर अनेकांचं स्वप्न असतं. हा प्राणी घरात आला की एक सदस्य बनून जातो. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणंच लोक या कुत्र्यांवर जीव लावतात. सध्या सोशल मीडियावर अनेक गोंडस प्राण्याचे तर कधी लहान मुलांचे मनाला भावनारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. शिवाय नेटकरी त्यांच्या आवडीचे व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह नेटकऱ्यांना आवरता येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पालकांनी घरी कुत्र्याचं पिल्लू आणून त्यांच्या दोन मुलांना सरप्राईज दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. घरात कुत्र्याचं पिल्लू आहे याची या दोन्ही मुलांना कल्पना नसते. ते शाळेतून घरी येतात आणि दोघांमधील एका मुलाचं अचानक सोफ्यावर बसलेल्या पिल्लाकडे लक्ष जातं. त्याला विश्वासच बसत नाही. तो लगेच त्याच्या भावाला हे पिल्लू दाखवतो. हे दोघेही या पिल्लाजवळ धावत जातात आणि त्या पिल्लाला गोंजारु लागतात. त्यांना इतका आनंद होतो की त्यातील एक मुलगा कुत्र्याला छातीशी धरुन रडू लागतो. आपल्या पाळीव प्राण्यांना बाळासारखं प्रेम करणारी लोकं तुम्ही याआधीही पाहिली असतील.

पाहा व्हिडीओ –

हा व्हिडीओतून पाळीव प्राण्यांबद्दल असणारं प्रेम पाहायला मिळालं. हा सरप्राईजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video kids surprise turn into pure joy after realising they are getting a dog srk